Winter Health Tips : पेरू हे असे फळ आहे जे सर्वांनाच खूप आवडते, कारण त्याची चव खाण्यात आंबट-गोड असते. पेरू मीठाबरोबरही चविष्ट लागतो. पण काही लोक हिवाळ्यात पेरू खाणे टाळतात. पेरू खाल्ल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो, असे अनेकांना वाटते. मात्र, असे अजिबात नाही. पेरू खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. हिवाळ्याच्या दिवसांत जास्त प्रमाणात पेरू खाल्ल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. पेरू तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकतो आणि त्यामुळे तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास खूप मदत होते. थंडीच्या दिवसांत अनेक बाहेरचे चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे वजन वाढते. पेरूमुळे तुमचे वजन कसे नियंत्रित करता येईल? ते जाणून घ्या.
Best Weight loss Tips : हिवाळ्यात पेरूने तुमचे वजन नियंत्रित करा
पेरू शरीराच्या बहुतांश समस्या दूर करतो, त्यात व्हिटॅमिन B1, B3, B6 असते. याबरोबरच पेरूमध्ये हेल्दी मिनरल्स, फोलेट आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. या फळामध्ये कर्बोदके कमी असतात. हे खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक आजार दूर होतात. जर तुम्ही पेरू खाल्ले तर ते तुमच्या पचनासाठी खूप चांगले आहे आणि वजन कमी करण्यासाठी योग्य पचन आवश्यक आहे. हे फळ तुमची पचनसंस्था मजबूत करून वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच, तुमच्याकडे आणखी एक उत्तम पर्याय आहे, जर तुम्हाला काहीतरी गोड खावेसे वाटत असेल तर तुम्ही गोड खाण्याऐवजी पेरू खाऊ शकता. पेरू तुम्हाला खूप वेळ ऊर्जा देते. म्हणूनच हिवाळ्यात हे फळ तुमच्यासाठी योग्य आहे.
Guava Benefits ; खोकल्यामध्ये पिकलेले पेरू कधीही खाऊ नका
जर तुम्ही काही मसालेदार किंवा जड अन्न खाल्ले असेल तर ते तुमच्या पोटातील जळजळ शांत ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात खोकला असला तरी या समस्येत तुम्ही पेरू आणि त्याची पाने खाऊ शकता. कफ झाल्यास पिकलेला पेरू कधीही खाऊ नये. यामुळे तुमचा खोकला आणखी वाईट होऊ शकतो. अनेकांना पोटात बद्धकोष्ठतेची तक्रार असते त्यामुळे हे फळ पोट साफ करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरू हृदयरोग्यांसाठी रामबाण औषधाप्रमाणे काम करतो, कारण त्यात असलेले पोटॅशियम हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :