Toilet Museum : टॉयलेट हे स्वच्छतेचे लक्षण आहे. त्यासाठी 'जहां सोच वहां शौचायल' असं स्लोगन आहे. स्वच्छतेसंदर्भात अनेक योजना आखल्या जातात. मात्र, तुम्हाला माहित आहे का की दिल्लीत अशी एक जागा आहे जिथे शौचालयाचे संग्रहालय (Toilet Museum) आहे. नवी दिल्लीतील महावीर एन्क्लेव्ह येथे आंतरराष्ट्रीय सुलभ शौचालय संग्रहालय आहे. या ठिकाणी जवळपास 50 देशांतील एकापेक्षा एक टॉयलेट लावण्यात आली आहेत. यापैकी काही शौचालय 3000 इसवी सन पूर्व ते 20 व्या शतकातील आहेत. काही सोन्याचे तर काहींवर अप्रतिम नक्षीकाम केले आहे.
संग्रहालयाची स्थापना कधी झाली?
या आंतरराष्ट्रीय सुलभ शौचालय संग्रहालयाची स्थापना 1992 साली झाली. जगभरातील 50 देशांतील स्वच्छतागृहे येथे प्रदर्शित करण्यात आली आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला 100 वर्षांपूर्वी वापरण्यात आलेली शौचालये पाहायला मिळतील आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल एकापेक्षा एक माहिती मिळेल.
तुम्हालाही पाहता येईल हे संग्रहालय
हे आंतरराष्ट्रीय सुलभ शौचालय दिल्लीच्या महावीर एन्क्लेव्ह परिसरात आहे. तुम्ही दिल्लीत कुठेतरी राहत असाल तर तुम्ही मेट्रो आणि ऑटो रिक्षाने येथे पोहोचू शकता. जर तुम्ही दिल्लीबाहेरचे असाल तर दिल्लीत आल्यानंतर गुगल मॅपवर सुलभ इंटरनॅशनल टॉयलेट म्युझियम (International Toilet Museum) टाकून सर्च करा. तुम्हाला संपूर्ण लोकेशन गुगल मॅपवर अचूक मिळेल. या संग्रहालयाचा पूर्ण पत्ता पालम डाबरी रोड, महावीर एन्क्लेव्ह, नवी दिल्ली असा आहे. हे संग्रहालय सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:00 पर्यंत पर्यटकांसाठी खुले असेल.
एक शौचालय सोन्याचंही आहे
या म्युझियममध्ये तुम्हाला एकापेक्षा एक अजब टॉयलेट पाहायला मिळतील. काही दुमजली आहेत, तर काही अप्रतिम कोरीवकाम केलेली आहेत. पण या सगळ्यात एक टॉयलेट खूप खास आहे आणि ते सोन्याचे आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठीही हे स्वच्छतागृह कुतूहलाचे केंद्र राहिले आहे. ते कोणी बनवले आणि ते कुठून आले हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला या आंतरराष्ट्रीय सुलभ टॉयलेट संग्रहालयाला भेट द्यावी लागेल.
महत्त्वाच्या बातम्या :