Sri Lanka Tour Of India: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात येत्या 03 जानेवारीपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मुंबई होणार आहे. त्यानंतर दुसरा आणि तिसरा टी-20 सामना अनुक्रमे 12 जानेवारीला पुणे आणि 15 जानेवारीला राजकोटमध्ये खेळवला जाईल. दरम्यान, हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय टी-20 संघ मैदानात उतरणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय टी-20 संघाची आतापर्यंतची कामगिरी चांगली ठरलीय.

हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 26 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले जाणार आहेत. यातील 17 सामने भारतानं जिंकले आहेत. तर, 8 सामन्यात श्रीलंकेच्या संघाला विजय मिळवता आलाय. तर, एक सामना अनिर्णित ठरलाय.

भारत-श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचं लाईव्ह स्ट्रिमिंग

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेला येत्या 03 जानेवारीपासून सुरुवात होईल.  भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या मालिकेचं प्रसारण केलं जाईल. इंग्रजी आणि हिंदीसह इतर भाषांमध्ये या मालिकेची कॉमेंट्री ऐकता येणार आहे. याशिवाय, डीडी स्पोर्ट्सवर देखील ही मालिका प्रसारित केले जाईल. परंतु केवळ डीडी फ्री डिश असलेल्या चाहत्यांना ही सुविधा मिळेल.

श्रीलंकेचा टी-20 संघ:

दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरिथ असालंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंडारा, महेश थेक्सान, प्रमोदनाथ वेल, डुक्कर राजपक्षे, दासुन बंधारा, डुक्कर, राजकुमार राजकुमार, डुक्कर, दुग्धशैली. मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा

भारताचा टी-20 संघ:

हार्दिक पंड्या (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.

भारत- श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचं वेळापत्रक:

सामना तारीख ठिकाण वेळ

पहिला टी20 सामना

03 जानेवारी  मुंबई संध्याकाळी 8 वाजता 

दुसरा टी20 सामना

05 जानेवारी  पुणे संध्याकाळी 8 वाजता 

तिसरा टी20 सामना

07 जानेवारी 

राजकोट

संध्याकाळी 8 वाजता वाजता

हे देखील वाचा-