Palindrome and Ambigram Today, 22/02/2022 : आजचा दिवस दुर्मिळ आहे. कारण आजची तारीख ही फक्त पॅलिंड्रोम (Palindrome) नाही तर अँबिग्राम (Ambigram) देखील आहे. आजची तारीख 22 फेब्रुवारी 2022 आहे. जर तुम्ही निट पाहिलं तर संख्यात्मक रूपात ही तारीख 22/02/2022 अशा प्रकारे लिहिली जाते. त्यामुळे ही एक पॅलिंड्रोम डेट आहे. तसेच ही अँबिग्राम देखील आहे. कारण ही तारीख सरळ आणि उल्टी वाचल्यानंतर एकसारखी दिसते.
जर आजच्या तारखेमधून स्लॅश काढून टाकले तर तुम्हाला हा अंक 22022022 असा दिसेल. यामध्ये फक्त शून्य आणि दोन हेच अंक आहेत. या तारखेमध्ये दोन अंकाचे देखील खास महत्व आहे.
न्यूमेरॉलॉजीच्यानुसार आजचा दिवस खास
जर न्यूमेरॉलॉजीनुसार 222 सिक्वेन्सला अँजल नंबर मानले जाते. तसेच दोन हा अंक रिलेशनशिप, पार्टनरशिपचा अंक मानला जातो.
शतकातील पाहिलं पँलिंड्रोम
डॉ. इनन यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिना तारीख आणि वर्ष हा फॉरमॅट पाहिला तर 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 3000 या काळात 36 पॅलिंड्रोम दिवसांपैकी पहिला दिवस 2 ऑक्टोबर 2001 (10-02-2001) होता आणि शेवटचा दिवस 22 सप्टेंबर 2290 (09-22-2290) असेल.
दिन महिना आणि वर्ष अशा फोरमॅटला जर लक्षात घेतले तर 21 व्या शतकात एकूण 29 पँलिंड्रोम दिवस आहेत. पहिला पँलिंड्रोम दिन हा 10 फेब्रुवारी 2001 ला होता तर शेवटचा हा 29 फेब्रुवारी 2092 पँलिंड्रोम दिन आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : गव्हाची चपाती की मल्टीग्रेन आटा रोटी, वजन कमी करण्यासाठी कोण ठरेल फायदेशीर?
- Weight Loss Tips : वजन कमी करायचंय? मग, आहारात नक्की सामील करा ‘ही’ फळं आणि भाज्या!
- Health Tips : शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी दररोज 'हे' एनर्जी ड्रिंक्स प्या, मिळतील अनेक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha