Gurmeet Choudhary : टीव्हीवरचा ‘राम’ अर्थात अभिनेता गुरमीत चौधरी (Gurmeet Choudhary) आज (22 फेब्रुवारी) आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.  अभिनेता नेहमीच त्याच्या लूकमुळे चर्चेत असतो. पण खूप कमी लोकांना माहिती आहे की, टीव्ही अभिनेता बनण्याआधी गुरमीत चौधरीचे आयुष्य खूप संघर्षमय होते. खूप मेहनत आणि परिश्रमानंतर त्याला हे स्थान मिळाले आहे.


गुरमीत चौधरीही इतर कलाकारांप्रमाणे अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला. पण, त्यालाही खूप संघर्ष करावा लागला. पैशासाठी कुलाब्यातील एका दुकानात त्याने वॉचमन म्हणूनही काम केले. एका मुलाखतीत गुरमीत चौधरीने स्वतः सांगितले होते की, मी ही गोष्ट केवळ यासाठी शेअर केली आहे की, मुंबईत येऊन अभिनेता होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला यातून प्रेरणा मिळावी. गुरमीत चौधरीचा जन्म लष्करी कुटुंबात झाला असला तरी, त्याला लहानपणापासूनच अभिनेता बनायचे होते.


मॉडेलिंगपासून सुरुवात!


अभिनेता होण्यापूर्वी गुरमीत चौधरी मॉडेलिंगही करायचा. त्याने ‘मिस्टर जबलपूर’चा किताबही पटकावला आहे. यासोबतच तो जाहिरातींमध्येही काम करायचा, त्यासाठी त्याला अवघे 1500 रुपये मिळायचे. यादरम्यान, त्याला एका दुकानात वॉचमनची नोकरीही करावी लागली. यानंतर टीव्हीवरील 'राम' या व्यक्तिरेखेने त्याला ओळख मिळवून दिली.


लवकरच देणार गुडन्यूज!


2004मध्ये याच मालिकेच्या सेटवर त्याची देबिनाशी भेट झाली. देबिनाने ‘रामायणा’त सीतेची भूमिका साकारली होती. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 2011 मध्ये लग्न केले. दोघांनीही त्यांचे संघर्षाचे दिवस एकत्र पाहिले आहेत. लवकरच गुरमीत आणि देबिना आई-बाबा होणार आहेत. देबिनाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोत दोघेही आनंदी दिसत आहेत. सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत गुरमीतने लिहिले आहे, "आम्ही आता दोघांचे तीन होणार आहोत, ज्युनियर चौधरी येत आहे".



हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha