Palghar News : शहापूर पाठोपाठ आता पालघरमध्येही बर्ड फ्लूने (Bird-flu) आपलं डोक वर काढलं आहे. वसई-विरार क्षेत्रात तीन दिवसांत तब्बल 31 हजार कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चिकनची मागणी देखील कमी झाली असून मासांहार खाणाऱ्यांचा कल सुद्धा माशांकडे पाहायला मिळतोय. परिणामी माशांचे भाव कमालीचे वाढले असून येथील लग्नसमारंभात देखील आता शाकाहाराला प्राधान्य दिले जात आहे.


राज्यांत सध्या बर्ड फ्लूचा कहर होताना दिसून येत आहे. पालघरमध्ये ही आता या रोगाने थैमान घातले आहे. वसई विरार क्षेत्रात मागील तीन दिवसांत 31 हजार कोंबड्या बर्ड फ्लूमुळे शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केल्या आहेत. पक्षांमध्ये आढळणारा बर्ड फ्लू हा रोग मागील बरीच वर्ष आढळत आहे. मागील काही वर्ष दर काही महिन्यांनी बर्ड फ्लू हा रोग आढळत असतो. आता देखील पुन्हा एकदा हा रोग आढळू लागल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे. चिकन खाणारे तसेच पोल्ट्री फार्म मालक अडचणीत आढळले आहेत.

 

माशांचे भाव वाढले

 

बर्ड फ्लूच्या भीतीने मासांहार खाणाऱ्यांनी चिकन सोडून माशांना अचानक मागणी वाढली आहे. वाढत्या मागणीमुळे सुरमई, घोळ, तांब या माशांचे भाव गगनाला भिडले आहेत. 600 रुपये प्रतिकिलो मिळणारा घोळ सध्या आठशे ते हजार रुपये किलोने विकला जात आहे. तर 250 रुपये प्रति किलोने मिळणारा चकला मासा 400 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. वाढत्या माशांच्या भावामुळे मांसाहार खाणाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. त्यामुळे पालघरमधील लग्न समारंभात सध्या शाकाहारी जेवणावर भर दिला जातोय.    

महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha