Dosa Recipe : नवरात्री मध्ये रंग, परंपरा, संगीत आणि नृत्य यांची रेलचेल असतेच. 26 सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. अनेक भक्तगण देवी देवतांना प्रसन्न करण्यासाठी तर काहीजण पोटाला आराम देण्यासाठी नवरात्रोत्सवात उपवास करतात. पण या दिवसांत विश्रांती घेणं तितकचं महत्त्वाचं आहे. विश्रांतीसोबत सात्विक आहाराकडेदेखील लक्ष देणं गरजेचं आहे. आज जाणून घ्या हलका-फुलका 'उपवासाचा डोसा' (Dosa Recipe) बनवण्याची रेसिपी...
'उपवासाचा डोसा' डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
- साबुदाणा - 1 कप
- दही - 2 चमचे
- भगर - अर्धा कप
- मीठ - चवीनुसार
- पाणी - गरजेनुसार
'उपवासाचा डोसा' बनवण्याची कृती -
- डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी साबुदाणे धुवून घ्यावेत.
- साबुदाण्यात पाणी ठेऊन ते चार तास भिजवावेत.
- साबुदाण्याप्रमाणे भगरदेखील धुवून घ्यावी.
- भगर अर्धा तास भिजत ठेवावी.
- भिजलेला साबुदाणा, भगर, दही आणि पाणी एकत्र करुन ती मिश्रण वाटून घ्यावं.
- मिश्रण खूप घट्ट वाटून घेऊ नये.
- तयार झालेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालावे.
- मिश्रण छान तयार झाल्यानंतर नॉन स्टिक तवा गरम करावा.
- नॉन स्टिक तव्यावर तेलाचे थेंब घालावेत.
- तव्यावर दोन चमचे पाणी घालावं आणि तवा पुसून घ्यावा.
- तवा छान गरम करुन घ्यावा.
- गरम झालेल्या तव्यावर तयार केलेल्या मिश्रणाचे दोन चमचे घालून वर्तुळाकार पसरवावे.
- गरमागरम डोसा आणि शेंगदाणा चटणी खायला अगदी चविष्ट लागतात.
उपवास करताना काय काळजी घ्यावी?
- नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी कामाशिवाय प्रवास करणे टाळावे.
- आजारी असल्यास उपवास करणे टाळावे.
- गरोदर महिलेने वैद्यकीय सल्ला घेऊन उपवासाबाबतचा निर्णय घ्यावा.
- आपल्या क्षमतेचा विचार करुन उपवास करण्याचा निर्णय घ्यावा.
- उपवास करताना व्यसन करू नये.
- उपवासादरम्यान फळे आणि दुधाचं सेवन करावं.
संबंधित बातम्या