Tips For Memory Improvement : वाढत्या वयाबरोबर स्मरणशक्तीही कमजोर होते, असे म्हटले जाते. पण, केवळ वृद्धत्वामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होत नाही, तर तुमच्या वाईट जीवनशैलीचाही तुमच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो. विशेषत: जर तुम्ही स्वतःची योग्य काळजी घेतली नाही, तर तुम्ही खूप लवकर गोष्टी विसरायला लागटा आणि ही स्थिती तुमची स्मरणशक्ती कमकुवत होत असल्याचे सूचित करते.


स्मरणशक्तीशी संबंधित ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा, ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती मजबूत होईल. स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला जाणून घेऊया...


अक्रोड


ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे सेवन मेंदूसाठी खूप चांगले मानले जाते आणि याचा उत्तम स्त्रोत म्हणजे अक्रोड. अक्रोडाचे सेवन केल्यास बुद्धी तीक्ष्ण होते. यासोबतच अक्रोड तुमची स्मरणशक्ती वाढवते. याशिवाय ते हृदय निरोगी ठेवण्यातही मदत करते.


देशी तूप  


देशी तुपाचा वापर प्राचीन काळापासून चालत आलेला आहे. जर, तुम्ही दररोज एक चमचा तुपाचे सेवन केले, तर ते तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करेल. यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी याचे सेवन करू शकता.


चहा किंवा कॉफी  


बरेच लोक चहा किंवा कॉफी पिण्यास नकार देतात. परंतु, तुम्ही दिवसातून 3 वेळा योग्य प्रमाणात चहा किंवा कॉफी घेऊ शकता, यामुळे तुमचा थकवा दूर होईल आणि त्यात असलेले कॅफीन तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास तुम्हाला मदत करेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा फक्त माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha