lucknow agra expressway :  रस्ते वीज पाणी याच मुद्द्यांवर आपल्याकडे वर्षानुवर्षं निवडणुका होत असतात. त्यात उत्तर प्रदेशमध्ये सध्या एक्सप्रेस वे वरून जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. लखनऊ आग्रा हा 302 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे सध्या युपीच्या निवडणुकीत (UP Election 2022) चर्चेत आहे. आयुष्यामध्ये ध्येय प्राप्ती हवी असेल तर योग्य रस्ता सापडणे आवश्यक आहे... राजकारणाचे ही तसंच आहे योग्य रस्ता सापडला तर अनेकांच्या करिअरचा मार्ग सुलभ होतो... उत्तर प्रदेशच्या राजकारणात सध्या याच रस्त्यांवरून किंबहुना एका एक्सप्रेस वे वरून जोरदार राजकीय महाभारत सुरु आहे..तो म्हणजे लखनौ आग्रा एक्सप्रेस वे... खूप वेगवेगळ्या कारणांनी हा चर्चेत आहे. त्यामुळे या एक्सप्रेस वे च्या निर्मितीमागची रंजक कहाणी त्याच्याशी निगडीत असलेले राजकीय किस्से आम्ही रिपोर्टमधून तुम्हाला दाखवणार आहोत..


उत्तर प्रदेशमध्ये एक्सप्रेस वे आणि राजकारण हे एकमेकात इतकं गुंतलं आहे की गेल्या तीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्याची सतत चर्चा, त्यावरून वाद कधी श्रेयाची लढाई होत राहिली आहे. देशातला पहिला एक्सप्रेस वे महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबई दरम्यान बांधला गेला..त्यानंतर जवळपास एका दशकानंतर उत्तर प्रदेशात पहिला एक्सप्रेस वे उभा राहिला.. आग्रा ते दिल्ली...मायावतींच्या काळात 2007 ते 12 मधे तो बांधला गेला.. सुरुवात उशिरा झाली असली तरी नंतर एक्सप्रेस वे उभारणीमध्ये उत्तर प्रदेशनं चांगलाच वेग पकडला.


सात एक्स्प्रेसवे उत्तर प्रदेशात 


देशामध्ये दोन हजार किलोमीटर लांबीचे एक्सप्रेसवे त्यापैकी 1 हजार किलोमीटर लांबीचे एक्सप्रेस वे उत्तर प्रदेशात जवळपास सात एक्स्प्रेसवे उत्तर प्रदेशात आहेत. महाराष्ट्रात सध्या कार्यरत असलेला एकमेव एक्सप्रेसवे म्हणजे पुणे मुंबई तो साधारण शंभर किलोमीटरचा आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात 2012 ते 2022 या गेल्या आठ दहा वर्षांमध्येच एक हजार किलोमीटरचं हे जाळ उभा राहिला आहे. देशातला सर्वात लांबीचा पूर्वांचल एक्सप्रेस वे लखनऊ ते गाजीपुर यात राज्यात आहे. अखिलेश यांचा हा पेट प्रोजेक्ट.. 2017ची विधानसभा निवडणूक सुरू होण्याआधी त्याचे उद्घाटन रेकॉर्डब्रेक वेळेत म्हणजे 22 महिन्यातच काम पूर्ण केलं.  


प्रस्तावित बजेटपेक्षा कमी खर्चात प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा


तीनशे दोन किलोमीटर लांबीचा हा एक्सप्रेसवे अवघ्या बावीस महिन्यात पूर्ण केला आहे. विशेष म्हणजे जे प्रस्तावित 15 हजार कोटींचं बजेट होतं. त्यापेक्षा कमी खर्चात म्हणजे जवळपास अकरा हजार कोटीत हा प्रकल्प पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. त्यात सर्वात महत्त्वाचा रोल बजावला तो कुठल्याही वादा विना झालेल्या भूमिअधिग्रहणानं. जवळपास तीन हजार हेक्टर जमीन कुठल्याही वादा विना या एक्सप्रेस वे साठी अधिग्रहित करण्यात आली. तीनशे दोन किलोमीटरच्या या एक्सप्रेसवेवर छोट्या चार चाकी वाहनांसाठी सहाशे रुपये इतका टोल टॅक्स आकारला जातो. एक्सप्रेस वे बांधताना जमीन हस्तांतरणाचे वाद होणार नाहीत. कारण पहिला एक्सप्रेसवे बांधताना जमीन हस्तांतरण वरून खूप मोठा वाद झाला होता. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्न करण्यात आला.


लखनऊ आग्रा एक्सप्रेसवे चे सामरिकदृष्ट्या महत्त्व 


देशात सर्वाधिक लांबीचा 340 किलोमीटर चा पूर्वांचल एक्सप्रेस वे उत्तर प्रदेशात आहे तर पाठोपाठ लखनऊ आग्रा हा तीनशे दोन किलोमीटरचा एक्सप्रेसही इथेच. शिवाय लखनऊ आग्रा एक्सप्रेसवे चे सामरिकदृष्ट्या महत्त्व देखील आहे. या एक्सप्रेस वे च्या नावावर एक वेगळा विक्रम देखील देशातला पहिला एक्सप्रेस वे जिथं विमानांचं हेअर लँडिंग. सुखोई मिराज सारखी फायटर विमान या एक्सप्रेस वेवर. हवाई दलाने आणीबाणीच्या स्थितीत पर्याय म्हणून या एक्सप्रेसवेवर ही यशस्वी चाचणी घेतली आहे..


उत्तर प्रदेशाच्या राजकारणात एक ग्रह असाही आहे की जो मुख्यमंत्री एक्स्प्रेसवे बांधतो तो पुन्हा निवडून येऊ शकत नाही. मायावती, अखिलेश यांच्या बाबतीत ते झालं त्यामुळे ही चर्चा सुरु झाली. पण अर्थात या आधीचे असे काही इतर ग्रह योगी आदित्यनाथ यांनी मोडून काढले आहेत, त्यामुळे आता हाही ग्रह मोडला जाणार का याची उत्सुकता असेल.