Weight Loss Tips : जर तुम्ही चहा पिण्याचे शौकीन आहात परंतु तुम्हाला वजनही कमी करायचे आहे. तर यासाठी तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला वजन कमी करण्यासाठी चहा सोडण्याची गरज नाही. तर तुम्हाला चहाच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. यासाठी तुम्हाला चहा दुधाशिवाय प्यावा लागेल. आज आम्ही तुम्हाला चहाचे असे 5 प्रकार सांगणार आहोत जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करतील. 


1. आले आणि मधाचा चहा : आले आणि मधाचा चहा प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी आले पाण्यात टाकून उकळा. आता त्यात थोडी चहाची पाने टाका आणि उकळी आल्यानंतर गाळून घ्या. आता त्यात 1 चमचा मध टाकून प्या. यामुळे तुमचे वजन कमी होईल आणि सर्दी आणि फ्लू देखील बरा होईल.


2. तुळशीचा चहा : दिवसातून एकदा तरी तुळशीचा चहा जरूर प्यावा. यासाठी 1 कप पाणी ठेवा आणि उकळी आल्यानंतर त्यात तुळशीची पाने ठेचून घाला. आता त्यात चहाची पाने टाका आणि उकळवा. ते गाळून गरमागरम प्या.


3. तमालपत्र चहा : तमालपत्र चहा बनवण्यासाठी भांड्यात पाणी उकळत ठेवा. आता त्यात 3 तमालपत्र आणि चिमूटभर दालचिनी पावडर घाला. 10 मिनिटे शिजवा. चहा गाळून घ्या आणि त्यात थोडे मध आणि लिंबू टाकून गरम प्या. 


4. लेमन टी : काही लोकांना लेमन टी खूप आवडतो. बारीक व्हायचे असेल तर लेमन टी जरूर प्या. यासाठी 1 मोठा कप पाणी गॅसवर उकळा आणि त्यात चहाची पाने टाका. आता ते गाळून अर्धा लिंबू पिळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात मधही घालू शकता. तसेच पुदिनासुद्धा घालू शकता.


5. दालचिनीचा चहा : तुम्ही दालचिनीचा चहाही बनवून पिऊ शकता. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. यासाठी प्रथम 1 कप पाणी उकळून त्यात एक चतुर्थांश चमचे दालचिनी पावडर टाका. आता पाणी 2-3 मिनिटे शिजवा. आता ते एका कपमध्ये ठेवा आणि त्यात एक चमचा मध मिसळून तुम्ही हा चहा पिऊ शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :