World Food Safety Day 2022 : जागतिक अन्न सुरक्षा दिन 7 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना स्वच्छ, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न खाण्याची जाणीव करून देणे असा आहे. हा दिवस 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केला होता. दरवर्षी जगभरात 600 दशलक्ष लोक खराब अन्न खाल्ल्यामुळे आजारी पडतात. म्हणजेच, 10 पैकी एक व्यक्ती खराब अन्नामुळे आजारी पडतो. अशा परिस्थितीत, लोकांना खाण्याच्या चांगल्या सवयींबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. लोकांमध्ये याच बाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो.
खाण्याच्या चांगल्या सवयी
- काहीही खाण्यापूर्वी हात चांगले धुवावेत. भाज्या, चिकन, मांस, धान्ये इत्यादी व्यवस्थित स्वच्छ धुवून खा. याशिवाय तुम्ही ज्या भांड्यांमध्ये अन्न घेत आहात ती भांडी नीट धुवा. झुरळ, माश्या, मुंग्या इत्यादी भांड्यांमध्ये धोकादायक जीवाणू पसरवू शकतात.
- कच्चे आणि शिजवलेले पदार्थ नेहमी वेगळे ठेवा. शिजवलेले अन्न कच्च्या पदार्थांसोबत ठेवू नये कारण त्यात बॅक्टेरिया फार लवकर वाढतात, त्यामुळे शिजवलेले अन्न खराब होऊ शकते.
- कमी शिजलेले अन्न खाऊ नये. अन्न नेहमी नीट शिजवा आणि तेच खा. अशाप्रकारे जीवाणू नष्ट करतात.
- अन्न शिजवताना स्वच्छ पाणी आणि योग्य घटकांचा वापर करा. स्वयंपाक आणि पिण्यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याचा वापर केल्यास आरोग्यास कोणतीही हानी होत नाही.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :