मुंबई : जगप्रसिद्ध असलेले शिर्डीचे (Shirdi Mandir) साईमंदिर माझी वसुंधरा अभियानात राज्यात सलग दुसऱ्यांदा अव्वल ठरले आहे.  माझी वसुंधरा अभियानात शिर्डी देवस्थानाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.  राज्यातील स्वच्छ देवस्थानांमध्ये शिर्डीने बाजी मारली असून पंढरपूर वगळता सर्वच धार्मिक स्थळे स्वच्छतेच्या बाबतीत उदासीन असल्याच समोर आलं आहे. 


राज्यात शिर्डी , पंढरपूर, त्र्यंबकेश्वरसह अनेक महत्त्वाची देवस्थान असून माझी वसुंधरा अभियानात यावर्षी शिर्डी देवस्थानाने बाजी मारली आहे.  सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचे 3 कोटी रुपयांचे पारितोषिक पटकावले असून या पुरस्काराच शिर्डी ग्रामस्थांसह साईभक्तांनी स्वागत केले आहे. देशभरातून लाखो भाविक दरवर्षी शिर्डीत हजेरी लावतात. त्यामुळे शिर्डीतील स्वच्छता हे नगरपंचायत समोरील मोठे आव्हान आहे. तरी देखील सलग दुसऱ्या वर्षी शिर्डी नगरपंचायतने प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला असून याविषयी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी अधिक महिती दिली आहे.


स्वच्छ मंदिर सर्व्हेची यादी



  1. शिर्डी 

  2. पंढरपूर 

  3. शेगाव 

  4. त्र्यंबकेश्वर

  5. कोल्हापूर 

  6. जेजुरी 

  7. तुळजापूर 



माजी नगरसेवक सुजय गोंदकर म्हणाले,  हा पुरस्कार शिर्डी ग्रामस्थांचा असून आम्ही केलेल्या कामामुळे मिळालेला पुरस्कार आहे. आमच्या सर्वाना आनंद देणारा आहे.    शिर्डी नगरपंचायतला सलग दुसऱ्या वर्षी 3 कोटींचे प्रथम पारितोषिक मिळाले आहे.  राज्यातील देवस्थानच्या यादीत शिर्डीने अव्वल क्रमांक पटकावला आहे.  शिर्डी साई संस्थानच्या मदतीने केलेले काम इतर देवस्थानने केले तर राज्य स्वच्छ अभियानात देशात पहिल्या क्रमांकावर असले यात शंका नाही