Summer Tips : उन्हाळा म्हटलं की केसांच्या समस्या (Hair Problems) हमखास डोकं वर काढतात. कितीही वेळा केस धुतले तरी ते घामाने ओलेचिंब होतात. कारण राज्यात सध्या तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. कडक सूर्यप्रकाश आणि घामामुळे आपल्या केसांवर परिणाम होताना दिसतो, यामुळे केसाचे आरोग्य बिघडू लागते. उन्हाळ्यात तसं केस गळण्याची समस्या खूप सामान्य आहे. उन्हाळ्यात सामान्यत: केस गळू लागतात. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घेऊया कोणत्या चुकांमुळे आपले केस गळायला लागतात?


उन्हाळा आला की... केसांशी संबंधित समस्या वाढतात


काळे आणि दाट केस हे आपले व्यक्तिमत्व तर वाढवतातच शिवाय आपला आत्मविश्वासही वाढवतात. पण उन्हाळा आला की केसांशी संबंधित समस्या वाढतात. या ऋतूत केसगळती सुरू होते. अनेक वेळा उन्हाळ्यात केस गळण्याची कारणेही कळत नाहीत. पण सतत केस गळत राहिल्याने टाळू रिकामा होत जातो आणि नवीन केस वाढणे कठीण होते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, उन्हाळ्यात केस गळणे हे आपल्या काही चुकांमुळे होऊ शकते. या लेखात आम्ही तुम्हाला त्या चुकांबद्दल सांगणार आहोत. ज्यांमुळे केसगळती आणखी वाढते. त्यांच्याबद्दल जाणून घेऊया…


सूर्यप्रकाशाचा संपर्क


उन्हाळ्यात तसं घराबाहेर पडणे अवघड असतो, पण काहींना कामानिमित्त कडक उन्हात बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांचे केस थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतात. त्यामुळे सूर्याची अतिनील किरणे केसांची आर्द्रता शोषून घेतात आणि केसही निर्जीव होतात. तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर केसांना स्कार्फने सुरक्षित करा.


डोक्यातील कोंडा 


या मोसमात जास्तीत जास्त घाम येतो. यामुळे आपल्या केसांमध्ये बॅक्टेरिया सहज वाढतात. त्यामुळे केसांमध्ये अनेकदा कोंडा होतो. त्यामुळे केस हळूहळू गळू लागतात.


केस घट्ट बांधा


उन्हाळ्यात केस घट्ट बांधल्यानेही केस गळतात. खरं तर, उन्हाळ्यात आपण केस घट्ट बांधतो, तेव्हा घाम आपल्या केसांमध्ये अडकतो. त्यामुळे टाळूवर बॅक्टेरिया वाढू लागतात आणि केसांचे कूप कमकुवत होतात.


केस धुणे


उन्हाळ्यात धूळ, घाण आणि घामामुळे आपले केस चिकट होतात. त्यामुळे वेळोवेळी केस धुणे फार महत्वाचे आहे. पण विशेष काळजी घ्या की, जर तुम्ही तुमचे केस रोज शॅम्पूने धुत असाल तर यामुळे केस गळण्याचीही समस्या उद्भवू शकते.


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>


Heat Stroke : मोठी बातमी : मराठवड्यात उष्माघाताचा पहिला बळी; रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यूने गाठले