Summer Special Food : देशाच्या जवळपास सर्वच भागात तापमान वाढत आहे. विशेषत: उत्तर भारत आणि दक्षिण भारतात हवामान काहीसे उष्ण असते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात खाण्यापिण्याचा आरोग्यावर परिणाम होतो. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी थंडगार अन्नाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले असते. उन्हाळ्यात कोणते पदार्थ शरीरासाठी चांगले असतात हे जाणून घ्या.   



  • कलिंगड हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळ मानले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात या फळाचे सेवन नक्की करावे. कलिंगडात 90% पेक्षा जास्त पाणी असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. कलिंगड हे शरीराला थंडावा देणारे अँटिऑक्सिडेंट आहे.

  • उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी पुदिना हा एक चांगला पदार्थ आहे. तुम्ही दही, ताक किंवा रायतामध्ये पुदिना मिक्स करू शकता. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.

  • उन्हाळ्यात काकडी हा एक चांगला पर्याय आहे. त्याचा कूलिंग इफेक्ट आहे. काकडीचा वापर सॅलड, ज्यूस, डिटॉक्स ड्रिंक्स आणि रायतामध्ये करता येतो. त्यामध्ये 90% पर्यंत पाणी असते.

  • नारळ पाणी हे उन्हाळ्यातील सर्वोत्तम पेय आहे. नारळाच्या पाण्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक असतात. त्यामुळे शरीर थंड राहते आणि अनेक आजार दूर राहतात.

  • उन्हाळ्यात लिंबू पाण्यामुळे तुमचे शरीर थंड राहते आणि तुम्ही ताजेतवाने राहता. दिवसातून दोनदा हलकी साखरेसोबतही सेवन करू शकता. त्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

  • उन्हाळ्यात दही हा एक चांगला पर्याय आहे. दह्यामध्ये असे गुणधर्म आहेत जे शरीराला थंड ठेवतात. त्यामुळे पचनक्रिया बरोबर राहते.जर तुम्हाला दह्याची ऍलर्जी असेल तर त्याचे सेवन करू नका.

  • संत्र्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत होते. संत्र्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते जे उन्हाळ्यात आवश्यक मानले जाते.

  • टरबूज हे उन्हाळ्यातील एक खास फळ आहे. त्यात 90% पर्यंत पाणी असते आणि ते पचायला सोपे असते. शरीर थंड ठेवण्यास नक्कीच मदत होते. याशिवाय तुम्ही काकडीचेही सेवन करू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :