Sneezing Facts: लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत कोणालाही शिंका (Sneeze) आल्यावर त्या व्यक्तीचे डोळे बंद होतात. पण तुम्हाला माहित आहे का असं का होतं? नाही? तर जाणून घेऊया शिंकताना डोळे का बंद होतात... प्रथम आपल्याला शिंका नेमक्या का येतात? हे जाणून घेऊया.


आपल्याला शिंका का येतात?


अहवालानुसार, शिंका येणे ही शरीराची बचावात्मक प्रतिक्रिया असते. जेव्हा श्वसनात अडथळा निर्माण करणारे घटक श्वसननलिकेत अडकतात, त्यावेळी मेंदूतील त्रिमितीय मज्जातंतूना संदेश पाठवतात. यावेळी आपली फुफ्फुसं जास्त प्रमाणात ऑक्सिजन साठवतात आणि एकदाच ती हवा बाहेर फेकली जाते, नलिकेत अडकलेले घटक शिंकेमार्फत बाहेर फेकले जातात. जेव्हा कोणतेही जीवाणू, विषाणू किंवा इतर घातक गोष्ट जेव्हा एखाद्याच्या नाकात शिरते, तेव्हा ती शिंकल्यामुळे त्वरित बाहेर फेकली जाते.


शिंकताना डोळे बंद का होतात?


शिंका येण्याआधी आपले शरिर स्वतः त्या प्रक्रियेसाठी तयार होते. यादरम्यान छातीचे स्नायू टाईट होतात. शिंका येण्यासाठी मेंदूतील त्रिमितीय मज्जातंतू जबाबदार असतात. त्यांचं नियंत्रण डोळे (Eyes), नाक, तोंड आणि जबड्यावर असतं. यामुळेच शिंका आल्यावर या सर्व अवयवांच्या स्नायूंवर प्रभाव पडतो आणि त्यामुळे शिंकताना आपले डोळे बंद होतात. तसेच याव्यतिरिक्त हवेतील विषाणूंपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी डोळे बंद होत असल्याचं सांगण्यात येतं. वास्तविक, शिंकताना डोळे बंद करणे ही एक स्वयंचलित क्रिया आहे. तज्ज्ञांच्या मते, शिंकताना डोळे बंद केले जातात जेणेकरून तोंडातून बाहेर पडणारे बॅक्टेरिया डोळ्यांमध्ये जाऊ नयेत.


जर कोणी शिंकताना डोळे उघडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या दाबाने डोळ्यांच्या बाहुल्या देखील बाहेर येऊ शकतात, असं म्हटलं जातं. मात्र आतापर्यंत याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. 


शिंकताना आवाज का येतो?


जेव्हा आपण शिंकतो तेव्हा आवाज देखील येतो, त्यामागील कारण म्हणजे फुफ्फुसात भरलेली हवा शिंकेवाटे एकत्र बाहेर येते. अशा स्थितीत जो आवाज होतो तो हवा बाहेर पडण्याचा आवाज असतो. फुप्फुसांत हवा जितकी जास्त भरली जाते, तितका मोठा आवाज शिंकताना येतो.


या कारणांमुळेही येतात शिंका 


कधी-कधी नाकात धुळीचे कण जातात, त्यामुळे नाकात एक वेगळ्या प्रकारची संवेदना जाणवते. त्यातून चिडचिड, अस्वस्थ वाटू लागतं. नाकातील हे कण, विषाणू बाहेर काढण्यासाठी शिंक येते. अनेकदा अ‍ॅलर्जीमुळेदेखील शिंक येते. उदाहरण म्हणजे काहींना परफ्यूमच्या तीव्र सुगंधामुळे, धुळीमुळे शिंक येते. कधी-कधी तीव्र प्रकाशामुळे डोळ्याची रेटिना आणि मेंदूकडे जाणार्‍या ऑप्टिक नसा सक्रिय होतात, ज्यामुळे शिंका येते.


हेही वाचा:


Life Hack: शॅम्पूचे 100 पाऊच घेणं फायदेशीर की 100 रुपयांची एक बॉटल घेणं? काय जास्त योग्य?