Skin Care Tips : आपल्या सर्वांच्या आयुष्यात एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला मुरुमांमुळे (Pimples) त्रास होतो. पिंपल्स चेहऱ्याचे सौंदर्य (Skin Care Tips) हिरावून घेतात. चेहऱ्यावर मुरुम दिसण्याची अनेक कारणे असू शकतात. सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि चुकीची जीवनशैली. मुरुम फोडल्याने ते लवकर बरे होतात, असा अनेक लोकांचा गैरसमज आहे. पण, तुमचा हा समज चुकीचा आहे.   


मुरुम फोडणे किंवा त्याच्याशी छेडछाड केल्याने ही समस्या आणखी वाढू शकते. म्हणून, मुरुमांच्या बाबतीत थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. 


पिंपल्स फोडण्याची चूक करू नका


जेव्हा जेव्हा मुरुम येतात तेव्हा ते स्वतःच बरा होऊ द्या. मुरुमाला वारंवार स्पर्श केल्याने, तुमच्या हातातील जंतू मुरुमांभोवतीच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. जर ते नैसर्गिकरित्या बरे झाले तर त्वचेवर कोणतेही डाग दिसत नाही. मुरुमांवर बोटांनी किंवा नखे ​​लावल्याने ते वाढू शकतात.


पिंपल्सना नखं लावू नका 


पोपिंग पिंपल्समुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका वाढतो. जेव्हा आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स दिसतात तेव्हा आपल्याला असे वाटते की यामुळे आपले सौंदर्य कमी झाले आहे. खरंतर, मुरुमांद्वारे आपल्या त्वचेच्या आत असलेली घाण साफ होते. पिंपलमध्ये असलेल्या बॅक्टेरिया पसरण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे तुमच्या त्वचेवर एकामागून एक मुरुम दिसू शकतात. त्यामुळे तुम्हालाही पिंपल्सचा त्रास होत असेल तर ते नैसर्गिकरित्या बरे होऊ द्या.


पिंपल्स टाळण्यासाठी 'हे' उपाय करा 


मुरुमांवर मध लावा


मधामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. हे नैसर्गिकरित्या मुरुम बरे करण्यासाठी प्रभावी ठरतात. पिंपल्स बरे करण्यासाठी, दिवसातून दोनदा मध लावा. यामुळे आठवडाभरात पिंपल स्वतःच बरे होईल आणि मधाच्या वापरामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो देखील येईल.


एलोवेरा जेलचा वापर करा  


एलोवेरा जेलचा वापर त्वचेसाठी नेहमीच केला जातो. तुम्ही एलोवेरा जेल सकाळी आणि रात्री मुरुमांवर लावा. यामुळे मुळांपासून संसर्गास कारणीभूत असलेले बॅक्टेरिया नष्ट होतील.


थंड किंवा गरम कॉम्प्रेशन वापरा


मुरुम बरे करण्यासाठी, तुम्ही थंड किंवा गरम कॉम्प्रेशन वापरू शकता. यामुळे पिंपल्स बरे होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते. कोल्ड कॉम्प्रेशनसाठी, स्वच्छ सूती कापडात बर्फ गुंडाळा आणि मुरुमांवर फिरवा. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : तुम्हीही रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी विसरता का? चिंता सोडा, 'हे' खाद्यपदार्थ तुमची स्मरणशक्ती वाढवतील