Vitamin C For Skin : आपली त्वचा निरोगी आणि सुंदर बनवण्यासाठी व्हिटॅमिन सी (Vitamin C) खूप महत्त्वाचे आहे. व्हिटॅमिन सी डोळे, केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले आहे. शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता असल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होते. त्याचा परिणाम तुमच्या दात आणि नखांवरही दिसून येतो. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे त्वचेवरही अनेक लक्षणे दिसू लागतात. अशा वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने तुमच्यासाठी त्रासदायक होऊ शकते. अनेक वेळा हे असे का होते हे आपल्याला कळत नाही. असा वेळी आम्ही तुमच्यासाठी त्वचेच्या आजाराशी संबंधित काही समस्या सांगणार आहोत. ज्या व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे होतात. चला तर जाणून घेऊयात. 


व्हिटॅमिन सी शरीरासाठी का महत्वाचे आहे ? 


शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्वाचे आहे. हे एक जीवनसत्व आहे. आपल्याला दररोज व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. शरीरातील व्हिटॅमिन सी ची कमतरता तुम्ही अन्नाद्वारे पूर्ण करू शकता. यासाठी आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध फळे, भाज्या, मसाले आणि औषधी वनस्पतींचा समावेश करा. काही वेळा अनुवांशिक विकार आणि चयापचय विकारांमुळे व्हिटॅमिन सी ची कमतरता देखील होते. जास्त व्यायाम करणाऱ्या, मधुमेहाचे रुग्ण किंवा उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांमध्ये व्हिटॅमिन सी ची कमतरता जास्त भासते.


त्वचेवर व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे 'ही' लक्षणे दिसतात


1. कोरडी निर्जीव त्वचा - जर तुमची त्वचा खूप कोरडी आणि निर्जीव राहिली असेल. जर त्वचेचा वरचा थर कोरडा झाला असेल तर ही व्हिटॅमिन सी ची कमतरता असू शकते. मात्र, काही वेळा हवामान बदलल्याने किंवा कमी पाणी प्यायल्यानेही त्वचेत कोरडेपणा येतो. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर त्वचारोग तज्ज्ञांना भेटा. 


2. बरे होण्यास उशीर - अनेक वेळा व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे जखमा भरून येण्यास वेळ लागतो. अनेक वेळा लोकांना याचे कारण समजत नाही. परंतु, शरीरात व्हिटॅमिन सी कमी असल्यास जखम काही दिवसात बरी होते. हे त्वचेवर व्हिटॅमिन सी च्या कमतरतेचे लक्षण असू शकते.


3. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात - ज्या लोकांची त्वचा खूप कोरडी असते, त्यांच्या चेहऱ्यावर लवकरच सुरकुत्या दिसू लागतात. जर त्वचेचा कोरडेपणा अधिक वाढला आणि त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या तर समजून घ्या की ही व्हिटॅमिन सी ची गंभीर कमतरता आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे डोळ्यांभोवतीची त्वचाही आकुंचन पावू लागते. ही सर्व व्हिटॅमिन सी च्या कमतरतेची लक्षणे आहेत. 


4. त्वचेवर पुरळ - शरीरात व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे त्वचेवर पुरळ उठू लागते. काही लोकांना त्वचेवर लहान लाल बारीक फोड्या दिसू लागतात. ही सर्व लक्षणे शरीरात व्हिटॅमिन सी ची कमतरता दर्शवतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :