Skin Care Tips : प्रत्येक स्त्री, महिला, मुलगी आपल्या त्वचेची (Skin Care Tips) काळजी घेण्यासाठी अनेक स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर करते. यामुळे अनेक फायदे देखील मिळतात. पण, अनेकदा त्वचेला हे स्किन कोअर प्रोडक्ट्स सूट देखील करत नाहीत. व्हिटॅमिन सी सीरम देखील यापैकीच एक आहे.
व्हिटॅमिन सी सीरमचा वापर चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी आणि टोन्ड ठेवण्यासाठी केला जातो. पण, असे अनेक लोक आहेत ज्यांना हे सीरम सूट होत नाही. याचं कारण म्हणजे, प्रत्येकाची स्किन टोन वेगळी असते. काही लोकांची त्वचा सामान्य असते आणि काही लोकांची त्वचा संवेदनशील असते. अशा वेळी ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी पॅच टेस्ट करूनच व्हिटॅमिन सी सीरमचा वापर करावा.
व्हिटॅमिन सी सीरम कसे लावावे?
व्हिटॅमिन सी सीरम लावण्यापूर्वी चेहरा फेसवॉशने धुवा आणि नंतर सॉफ्ट टॉवेलने पुसून चेहऱ्यावर टोनर लावा. नंतर 2-3 मिनिटांनंतर, व्हिटॅमिन सी सीरम लावा आणि काही काळासाठी सोडा आणि नंतर थोड्या वेळाने मॉइश्चरायझर लावा. जर तुम्ही हे सिरम सकाळी लावत असाल तर शेवटी सनस्क्रीन लावायला विसरू नका. जर तुम्ही ते रात्री लावत असाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी सनस्क्रीन लावा.
व्हिटॅमिन सी सीरमचे फायदे
- व्हिटॅमिन सी सीरम वापरल्याने, तुमचा चेहरा आतून हायड्रेटेड होतो.
- व्हिटॅमिन सी सीरम वापरल्याने आपल्या चेहऱ्याचे रक्ताभिसरण चांगले राहते. ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
- तुम्ही ते इतर कोणत्याही स्किन केअर प्रोडक्टबरोबर देखील वापरू शकता.
- व्हिटॅमिन सी सीरम आपल्या त्वचेतील जखमा भरून काढण्याचे काम करते. हे सीरम आपल्या त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते.
- यामुळे चेहऱ्याचा लालसरपणा कमी होतो आणि हायपरपिग्मेंटेशनच्या समस्येपासून आराम मिळतो.
- डोळ्यांखालील डार्क सर्कल्सच्या समस्येपासून मुक्त होण्यासही मदत होते.
- व्हिटॅमिन सी सीरम आपल्या त्वचेमध्ये कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्याचे काम करते, ज्यामुळे त्वचेची सैल होण्याची समस्या दूर होते.
- व्हिटॅमिन सी सीरम आपल्या त्वचेला सूर्याच्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून वाचविण्याचे काम करते.
- यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास मदत होते.
- व्हिटॅमिन सी सीरम आपल्या त्वचेला अंतर्गत पोषण प्रदान करते आणि ते वापरल्याने आपल्या चेहऱ्याचा ग्लो आणखी वाढतो.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.