Skin Care Tips : उन्हाळ्यात चेहऱ्यावरील त्वचेच्या डागांची समस्या बहुतेकांना भेडसावते. यावर नेमका उपाय काय याच्या शोधात बहुतेक जण असतात. हे बदल वर्षानुवर्षे अखंड सूर्यप्रकाशामुळे झाले आहेत. म्हणून नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांत आपल्या त्वचेची चांगली देखभाल केल्याने उन्हापासून होणारे नुकसान टाळता येते. उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी यावर प्लॅस्टिक अँड एस्थेटिक सर्जन डॉ श्रद्धा देशपांडे यांनी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत. जाणून घ्या सविस्तर माहिती. नेहमी हायड्रेटेड रहा - उन्हाळ्याच्या महिन्यांत आपल्याला चांगल्या प्रकारे हायड्रेटेड राहण्याची गरज आहे. उन्हाळ्यात पाणी पिण्याची गरज अधिक वाढते. त्यामुळे दररोज किमान 3-4 लीटर पाण्याचे सेवन करा.
उन्हापासून संरक्षण - उन्हात फिरताना चेहऱ्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. घरातून बाहेर पडताना पाण्याची बॉटल, सनग्लासेस, आणि चेहऱ्याचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फचा वापर करावा. तसेच सनस्क्रिन लावून घराबाहेर पडावे. तुमच्या त्वचेचा प्रकार जाणून घ्या - एका अभ्यासानुसार 88% लोक त्यांचा स्किन टोन न पाहता चुकीचे उत्पादने वापरतात. त्यामुळे तुमच्या स्किन टोननुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच स्किन प्रोडक्टचा वापर करा. क्लिनिंग आणि मॉइश्चरायझिंग - उन्हाळ्यात दिवसातून किमान दोनदा सॅलिसिलिक अॅसिड असलेल्या सौम्य एक्सफोलिएटिंग वॉशने तुमचा चेहरा स्वच्छ करण्याचा सल्ला दिला जातो. चेहरा, मान आणि छातीवरील त्वचा पातळ आहे, म्हणून या भागात कठोर अल्कधर्मी साबण वापरणे टाळा. उन्हाळ्यात सकस आहार - उन्हाळ्याच्या दिवसात आपण जे खातो त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नये. नेहमी आंबा, पपई, अननस, गाजर, टरबूज आणि बीटरूट्स सर्व पालेभाज्यांच्या हिरव्या भाज्या खा. सॅलड्स, दही आणि ताजी फळे नेहमी खा. साध्या आहारातील बदल आपल्या आतड्याची ताकद सुधारण्यासाठी आणि आपल्याला चमकणारी त्वचा देण्यासाठी उपयोगी पडतात. तळलेले पदार्थ कमी खा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :