DC vs RCB : आज आयपीएलमधील (IPL 2022) पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद (PBKS vs SRH) या दोन संघात सामना पार पडणार आहे. यंदा दोन्ही संघाचा फॉर्म समान दिसत आहे. कारण दोघांनी देखील पाच पैकी तीन सामने जिंकले असून प्रत्येकी दोन सामने गमावले आहेत.

  


आयपीएलमध्ये (IPL 2022) आज होणाऱ्या या पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद या दोन्ही संघाचे यंदाचे विजय-पराभव समसमान असल्याने आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ गुणतालिकेत चांगली झेप घेऊ शकतो. पंजाब आणि हैदराबादच्या इतिहासाचा विचार करता आतापर्यंत 17 वेळा दोघे आमने सामने आले असून हैदराबादने सर्वाधिक 12 सामने जिंकले आहेत. तर पंजाबने केवळ 5 विजय मिळवण्यात यशस्वी झाली आहे. तर आजचा हा सामना कधी आणि कुठे पाहू शकता, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


कधी आहे सामना?


आज 17 एप्रिल रोजी होणारा हा पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. 3 वाजता नाणेफेक होईल.  


कुठे आहे सामना?


हा सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.


कुठे पाहता येणार सामना?


पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबाद बंगळुरु यांच्यातील सामना स्टार स्पोर्ट नेटवर्कवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल. 


हे देखील वाचा-