Skin Care Tips after Facial: कोणत्याही कार्यक्रमाला किंवा पार्टीला जाण्यापूर्वी काही लोक पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतात. फेशियल हे स्किनच्या प्रकारानुसार केले जाते. फेशियलने स्किनवर तेज येते. तसेच चेहरा स्वच्छ होतो. 30 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांनी महिन्यातून एकदा फेशियल करावे. फेशियलचे गोल्ड फेशियल, फ्रुट फेशियल असे अनेक प्रकार आहेत. फेशियल केल्याने स्किनवरील टॅन कमी होतो. फेशियल केल्यानंतर त्वचेची विशेष काळजी घ्यावी. त्यामुळे फेशियल केल्यानंतर काही गोष्टी करणे टाळावे. जाणून घेऊयात फेशियलनंतर कोणत्या गोष्टी करू नयेत.
उन्हामध्ये जाणे टाळावे
फेशियल केल्यानंतर लगेच उन्हामध्ये जाणे टाळावे. फेशियल केल्यानंतर लगेच जर तुम्ही उन्हामध्ये गेलात तर तुमच्या चेहऱ्यावर रिअॅक्शन्स येऊ शकतात. जर बाहेर जायचे असेल तर चेहरा पूर्णपणे कापडाने झाकून घ्यावा.
थ्रेडींग करू नये
फेशियल केल्यानंतर लगेच थ्रेडींग करू नये. कारण फेशियलनंतर लगेच थ्रेडींग केल्याने दोऱ्याचे कट्स लागू शकतात. त्यामुळे फेशियल करण्याआधी थ्रेडींग करावे.
तीन ते चार दिवस स्क्रब करू नये.
फेशियल केल्यानंतर तीन ते चार दिवस स्क्रब करू नये. कारण फेशियलनंतर स्किन सेंसिटिव्ह झालेली असते. त्यामुळे जर तुम्ही फेशियलनंतर स्क्रब केले तर तुमच्या स्किनवर रॅश येऊ शकते.
फेस मास्क लावू नये
फेशियल केल्यानंतर एक अठवडा फेम मास्क लावू नये. फेस मास्क लावल्याने स्किनवरील ग्लो कमी होऊ शकतो.
Health Care And Fitness Tips: चेहऱ्यावरील चरबी कमी करायचीये? ट्राय करा हा फेशियल योगा
4 तास चेहरा धुवू नये
फेशियल केल्यानंतर कमीत कमी 4 तास चेहरा धुवू नये. कोणत्याही फेसवॉशने किंवा पाण्याने चेहरा धुवू नये. जर चेहरावर चिकटपणा जाणवत असेल तर साध्या पाण्याचा स्प्रे चेहऱ्यावर मारून कपड्याने हलक्या हाथाने चेहरा पुसून घ्यावा.
Health Care Tips: 'या' लोकांनी चुकूनही करू नये दुधासोबत हळदीचे सेवन; आरोग्यावर होतील वाईट परिणाम
Health Care Tips: फळांच्या साली आहेत आरोग्यासाठी उपयुक्त; जाणून घ्या फायदे