Skin Care : आपण अनेकांच्या तोंडातून ऐकत असतो, आता काय उरलंय... वयाची चाळीशी उलटली की माझी..कुठं जायचंय सुंदर दिसून.. तर काही जण म्हणतात अभी तो मैं जवान हूं.. चाळीशी आली म्हणून काय झालं.. तसं पाहायला गेलं तर वयाची 40 ओलांडल्यानंतर शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ लागते. या वयानंतरच वृद्धापकाळ सुरू होतो. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात आणि हाडे कमकुवत होऊ लागतात. वृद्धापकाळातही स्वत:ला निरोगी आणि तरुण ठेवण्यासाठी तुम्ही रोज कोणते पदार्थ खाऊ शकता? आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार जाणून घ्या...


 



चाळीशीनंतर अनेक आजार होण्याची शक्यता


40 वर्षांनंतर, महिला आणि पुरुषांच्या चयापचय गती कमी होतात. अशा परिस्थितीत त्यांना अनेक आजार होण्याची शक्यता वाढते. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्हाला तुमच्या आहारात बदल करावा लागेल. वृद्धापकाळातही स्वत:ला निरोगी आणि तरुण ठेवण्यासाठी तुम्ही रोज कोणते पदार्थ खाऊ शकता? जाणून घ्या..


 


टोमॅटोमध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म


टोमॅटो वृद्धत्वविरोधी गुणधर्मांसाठी ओळखला जातो. त्यात लाइकोपीन नावाचे फायटोकेमिकल आढळते. हे तुम्हाला तरुण आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. टोमॅटोच्या सेवनाने तुमच्या शरीरातील कोलेजेनेस प्रक्रिया पूर्णपणे मंदावते आणि त्वचेवर चमक निर्माण होते.


 


माशांचे सेवन महत्वाचे


दीर्घकाळ तरुण राहण्यासाठी तुम्ही मासे देखील खाऊ शकता. त्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते, जे शरीरातील पेशींना एकत्र ठेवण्यास मदत करते. याशिवाय, यामध्ये आढळणारे प्रोटीन तुमच्या त्वचेचा पोत सुधारते आणि चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी करते.


 


सुक्या मेव्याचाही आहारात समावेश केला जाऊ शकतो


सुक्या मेव्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे शरीरातील पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करतात. त्यामध्ये ती सर्व जीवनसत्त्वे आणि पोषक घटक आढळतात, जे तुम्हाला तरुण ठेवण्यास मदत करतात.


 


बेरीमुळे त्वता तरुण राहण्यास मदत होते


बेरीमध्ये स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरीमध्ये फ्लेव्होनॉइड्ससारखे अनेक आवश्यक अँटीऑक्सिडंट असतात. फ्लेव्होनॉइड्समध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म आढळतात. त्वचा सुधारण्यासाठी आणि कोलेजन मजबूत करण्यासाठी हे उपयुक्त आहे.


 


दह्यामुळे त्वचा निरोगी राहते


दह्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे चेहऱ्यावरील मुरुमांच्या समस्या कमी करण्यास मदत करते. यामुळे सूज येण्यापासूनही आराम मिळतो. ज्यामुळे पिंपल्स लवकर बरे होऊ लागतात. दह्यामध्ये असलेले लैक्टिक ऍसिड त्वचेला खोलवर स्वच्छ करते आणि ती चमकदार बनवते. उन्हामुळे किंवा पिगमेंटेशनमुळे कोमेजलेल्या त्वचेवर दही लावल्याने हरवलेली चमक परत येऊ शकते.


 


हेही वाचा>>>


Beauty Secret : कियारा, करीना सारख्या अभिनेत्रींच्या ग्लोइंग स्कीनचे रहस्य माहित आहे? जाणून घ्या, एकदा ट्राय करा..


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )