Skin Care : बॉलिवूड अभिनेत्रींना जेव्हा आपण मोठ्या पडद्यावर पाहतो, (Beauty Secret) तेव्हा त्यांची त्वचा इतकी ग्लोईंग कशी दिसते? याबाबत आपल्या मनात अनेक प्रश्न येतात. या अभिनेत्रींना कधीही पाहिलं तरी त्या सुंदर दिसतात. अभिनेत्रीं प्रमाणे आपली त्वचाही इतकी सुंदर दिसेल का? अभिनेत्रींच्या ग्लोइंग स्कीनचे रहस्य काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या लेखात देण्याचा प्रयत्न करणार आहोत...
कियारा तिच्या चेहऱ्यावर एक खास फेस पॅक लावते.. ते म्हणजे...
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी महिला विविध उपाय करतात, अनेकदा प्रयत्न करूनही त्वचेवर परिणाम दिसत नाही. मग या अभिनेत्रींना पाहिल्यानंतरही बहुतेक महिलांच्या मनात हा प्रश्न येतो की त्यांच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे? आम्ही तुम्हाला सांगतो की सुंदर त्वचेसाठी अभिनेत्री देखील अनेक घरगुती उपाय वापरतात. कियारा अडवाणी, करीना कपूरसह अनेक अभिनेत्री अनेकदा मुलाखतींमध्ये त्यांचे सौंदर्य रहस्य शेअर करतात. कियारा अडवाणीने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की ती तिच्या चेहऱ्यावर एक खास फेस पॅक लावते. जो तिच्या आजीने लिहून दिला होता. या घरगुती उपायाबद्दल जाणून घ्या...
चमकदार त्वचेसाठी बेसन, मध, दुधाची साय आणि लिंबू यांचा फेस पॅक
चमकदार त्वचेसाठी बेसन
बेसन मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचा आतून स्वच्छ करते.
यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल साफ होते. यामुळे मुरुमेही कमी होतात.
बेसनामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे त्वचेला बॅक्टेरियाच्या संसर्गापासून वाचवतात.
बेसन टॅनिंग काढून टाकते आणि छिद्रे खोल साफ करते.
बेसनापासून बनवलेले फेस पॅक त्वचेवर चमक आणते आणि छिद्रांमधून बाहेर पडणारे अतिरिक्त तेल नियंत्रित करते.
मध त्वचेला मॉइश्चरायझेशन, मुलायम ठेवण्यासाठी आणि छिद्र स्वच्छ ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
स्वच्छ आणि चमकदार त्वचेसाठी लिंबाचा रस देखील गुणकारी आहे.
दुधाची मलई घाण आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकते आणि त्वचा आतून स्वच्छ करते.
यामुळे त्वचा मुलायम होते आणि चेहऱ्यावर चमक येते.
कियारा अडवाणी त्वचेची काळजी कशी घेते? हा फेशिअल मास्क कसा तयार करायचा?
साहित्य
बेसन - 1 टेबलस्पून
दुधाची मलई - 1 टेबलस्पून
मध - अर्धा टीस्पून
लिंबाचा रस - 1 टीस्पून
पद्धत
सर्वकाही चांगले मिसळा आणि पेस्ट तयार करा.
त्यात तुम्ही दूध देखील Add करू शकता.
आता अर्धा तास चेहऱ्यावर लावा.
यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.
काही दिवसातच फरक जाणवेल.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय वापरण्यापूर्वी, तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा)
महत्त्वाच्या इतर बातम्या :