Manoj Jarange Patil : सरकारचा (Government) सन्मान म्हणून एका महिन्याचा वेळ दिला आहे. कायद्याच्या चौकटीत टिकेल असे देऊ असे आरक्षण देऊ म्हणालेत. त्यामुळं एक महिना वेळ दिला असल्याचे मत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी व्यक्त केलं. दगा फटाका देऊ नका, रस्त्यावर उतरवू नका असं मंत्र्यांना म्हणालो असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. तुम्ही आरक्षण नाही दिलं तर विधानसभेला 4 ते 5 समुदायाचे लोक एकत्र मैदानात उतरणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. 


 धोका झाला तर समाजाचा मोठा अपमान


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार राजेंद्र राऊत आले होते. ते म्हणाले आमचं त्यांच्याशी बोलणं झालं असून SIT रद्द करणार असल्याचे ते म्हणालेत. फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणं झालं आहे. SIT ही माझी मागणी नाही, सागे सोयरे ही समाजाची मागणी असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
उपोषण सोडवताना मराठा कुणबी कायदा करण्यासाठी आम्हाला कायदा आणून टिकवायचं आहे हे मंत्र्यांचे शब्द होते असे जरांगे पाटील म्हणाले. धोका झाला तर समाजाचा मोठा अपमान आहे. मग मात्र त्यांचे खूप हाल होतील, विधानसभेला काय करायचं त्याबाबत समाजाशी बोलून निर्णय घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 


माझा चित्रपटात नाही तर आरक्षणात जीव


आरक्षण ओबीसीत नाही तर कशातून द्यायचं? कुणाला धक्का लागत नाही. मात्र, काही लोक सांगत नाहीत. जवळपास सगळे मराठे अरक्षणात गेलेत, राहिलेल्या लोकांना सोबत घेतलं पाहजे. नाही तरी आम्ही घेणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. माझा चित्रपटात जीव नाही तर आरक्षणात जीव असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. चित्रपट तयार करणाऱ्यांना  शुभेच्छा. मला 8 दिवस उठता येत नाही, नंतर बघेल, मला चित्रपटात इंटरेस्ट नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.


मी घरी, डोंगरात गेलो तरी आंदोलन सोडणार नाही 


माझ्यामुळे जर कोण निवडूण आले असं म्हणत असेल तर त्यांचा मोठेपणा मी समाजासाठी लढत असल्याने म्हणत असतील. टेबल वाजवणारे नाहीत म्हणून ते येत असतील असेही जरांगे पाटील म्हणाले.  मंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांची बैठक घेणार आहे. आजपासून खूप कामाला लागणार आहोत. मुंबईत मोठ्या घडामोडी होणार आहेत. अन्याय करायचं प्रयत्न केला तर मी मागे हटणार नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मी आता घरी जाणार आहे. तिथे जाऊन रणनीती ठरवणार आहे. मी घरी जाणार असेल तर त्यात काय लबाडी आहे. शहागड येथे आम्हाला कार्यालय घ्यावं लागणार आहे. अंतरवाली सोडायचा विषय नाही. लोकांना त्रास होऊ नये. वर्दळ होईल म्हणून शाहागड येथे कार्यालय करायचं म्हणालो असं जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली गावाचे उपकार मी कधीच विसरणार नाही. राज्याच्या पातळीवरचे काम आता आजपासून सुरु आहे. मी घरी, डोंगरात गेलो तरी आंदोलन सोडणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले.  


लई सलाईन लावले, आता नसा सापडत नाहीत


आंदोलनाचा ठिकाण अंतरवाली येथे असेल. शहागाड येथे लोकांच्या समस्या सोडवण्याचे एक ठिकाण म्हणून कार्यालय असेल असे जरांगे पाटील म्हणाले. तूर्तास आता उपोषण नाही. मला उठता येईना तोंड धुता येईना, त्यांनी लई सलाईन लावले आहेत. आता नसा सापडत नाहीत. पुढच्या वेळी डोंगरावर उपोषण करणार, कुणी म्हणालं नाही पाहिजे की आम्हाला त्रास झाला. गावातून, डोंगरावरुन आंदोलन करेन पण  समाजालाच न्यायच देणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


Manoj Jarange Patil : माझ्या कानावर 100 कोटींचा आकडा आलाय, मनोज जरांगेंचा खळबळजनक गौप्यस्फोट, शंभूराज देसाईंकडे मोठी मागणी