Food : हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शिवाची पूजा केली जाते. हा महिना व्रत-वैकल्याचा महिना समजला जातो. या काळात अनेक हिंदू मांसाहार करत नाहीत. या महिन्यात अनेक लोक सात्त्विक अन्न खात असल्याने ते लसूण आणि कांदाचे सेवन करत नाही. याचंच निमित्त साधून मॅकडोनाल्ड्सने (McDonalds) खास अशा खवय्यांसाठी आणला विशेष श्रावण मेनू... काही लोकांना तो पटला, पण काही लोकांना हा मेन्यू पाहताच तळपायाची आग मस्तकात गेली. एका फूड ब्लॉगरने McD चा व्हिडिओ शेअर केला, त्यावर अनेक यूजर्सनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय, जाणून घ्या.
मॅकडोनाल्ड्सच्या या मेन्यूवर जोरदार टीका
सध्या श्रावण महिना सुरू आहे, या निमित्त मॅकडोनाल्ड्सने आपल्या रेस्टॉरंटमध्ये मॅकचीज बर्गर आणि मॅकआलू टिक्की खास आणली आहे. त्यात कांदा आणि लसूण वापरला जात नसल्याचा दावा केला जात आहे, मात्र, एमसीडीच्या या मेन्यूवर जोरदार टीका होत आहे. एका फूड ब्लॉगरने McD चा व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की यावेळी McD ने सावन स्पेशल बर्गर सुरु केला आहे ज्यामध्ये कांदा आणि लसूण वापरला जात नाही. यानंतर युजर्सनी इंटरनेटवर क्लासेस सुरू केले. यूजर्स म्हणतात, हा केवळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे सोशल मीडियावरील यूजर्सचे म्हणणे आहे. ते म्हणतात की, बन्स बनवण्यासाठी जे पीठ वापरले जाते आणि तो श्रावण महिन्यात वापरू नये. कारण त्यात अंडी असण्याची शक्यता आहे.
हे सर्व केवळ प्रसिद्धीसाठी... - यूजर्स भडकले
अनेक यूजर्स म्हणतात की, श्रावण महिन्यात बाहेरचे खाण्याची गरज नाही. कंपनी हे सर्व केवळ प्रसिद्धीसाठी करत आहे, तर एका फूड ब्लॉगरने इंस्टाग्रामवर या मेन्यूचा फोटो शेअर केला आणि लिहिले, आता येथे जैन फ्रेंडली मॅकचीज बर्गर व्हेज उपलब्ध आहे, ज्यामध्ये कांदा, लसूण आणि मुळा वापरण्यात आलेला नाही. हा श्रावण स्पेशल नाश्ता असून अतिशय चविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. मला McD च्या स्वयंपाकघरात जाण्याचीही संधी मिळाली. व्हेज आणि नॉनव्हेजसाठी वेगळे विभाग आहेत हे जाणून आनंद झाला. असेही म्हटले
''काही दिवसांनी साबुदाणा बर्गरची विक्री सुरू होईल''
ब्लॉगरच्या पोस्टवर, एका यूजरने लिहिले की, काही दिवसांनंतर, McD उपवास करणाऱ्यांसाठी साबुदाणा बर्गरची विक्री सुरू करेल. आणखी एका युजरने म्हटले की, या पवित्र महिन्यात असे फॅन्सी फूड का खावे? किमान महिनाभर तरी घरी खाऊ शकतो. एका यूजरने लिहिले, McD मांसाहारही ठेवतो. अशा परिस्थितीत McD चा श्रावण स्पेशल बर्गर कसा खायचा? एका यूजरने सांगितले की, कांदा नाही, लसूण नाही पण बनमध्ये अंडी आहे.
हेही वाचा>>>
'नूडल्समुळे' तुटलं रेल्वेत नोकरीचं स्वप्न? एका रात्रीत झाला खेळ, तरुणाच्या एकाएकी मृत्यूने माजली खळबळ
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )