Soaked Almonds Benefits : भिजवलेले बदाम खाण्याची परंपरा फार पूर्वीपासूनच आहे. बदाम भिजवण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की त्यातील पोषकद्रव्ये पचायला सोपी जावीत आणि सालं सहज काढता येतात. बदाम भिजवल्याने त्यात असलेली पोषकतत्त्वे अधिक उपलब्ध होतात. पण साल काढून टाकल्यानंतर खरंच बदाम खावेत का? याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. 


बदामाच्या सालीमध्ये टॅनिन नावाचा पदार्थ असतो जो बदामातील पोषकद्रव्ये शोषून घेण्यापासून रोखतो. त्यामुळे साल काढून बदामाचे संपूर्ण पोषक तत्व शरीरात सहज शोषले जाऊ शकतात. बदामाची साल काढून टाकण्याचे इतर फायदे देखील आहेत. बदामाची साल कडू असल्यामुळे बदामाची चव खराब होते. साल काढल्याने बदामाचा गोडवा टिकून राहतो. बदामाच्या सालीवर आरोग्यासाठी हानिकारक कीटकनाशके आणि रसायने देखील असू शकतात. हे बदाम काढून टाकल्याने 100% शुद्ध आणि निरोगी राहतात.


बदाम हे अशा ड्रायफ्रूट्सपैकी एक आहे ज्याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. बदामाचे काही प्रमुख फायदे येथे आहेत.


हृदयासाठी फायदेशीर : हेल्दी फॅटी ऍसिडस्, विशेषतः मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स बदामामध्ये आढळतात जे हृदयासाठी चांगले असतात.


वजन कमी करण्यात मदत : बदामामध्ये फायबर, प्रथिने आणि चांगले फॅट्स असतात जे भूक नियंत्रित करण्यास मदत करतात आणि तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते.


रक्तातील साखरेचे नियंत्रण : बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.


योग्य पोषण : बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि इतर महत्त्वपूर्ण खनिजे भरपूर प्रमाणात असतात.


वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण : बदामामध्ये स्टेरॉल आणि फायबर असतात जे वाढत्या कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.


अँटिऑक्सिडंट स्त्रोत : व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जो शरीराच्या पेशींना नुकसान करणाऱ्या मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतो.


सांधे आणि स्नायूंसाठी : बदामामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे सांधे आणि स्नायू निरोगी ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत.


डोकं आणि त्वचेसाठी : बदामाचे तेल त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून वापरले जाते आणि ते त्वचा सॉफ्ट ठेवते.


या सर्व फायद्यांचा विचार करता रोजच्या आहारात बदामाचा समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते. तरीसुद्धा, ते कमी प्रमाणात सेवन केले पाहिजे, कारण ते कॅलरीजमध्ये खूप जास्त आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : BP च्या चुकीच्या रिडींगने सुद्धा वाढू शकते तुमची चिंता; जाणून घ्या रक्तदाब तपासण्यासाची योग्य वेळ आणि पद्धत