High Blood pressure : आजच्या जीवनशैलीत उच्च रक्तदाब ही एक सामान्य समस्या बनली आहे. बहुतेक लोक हाय बीपीची तक्रार करतात. अयोग्य खाण्यापिण्यामुळे, तसेच जास्त ताण घेतल्याने ही समस्या उद्भवते. रक्तदाबाची समस्या असेल, तेव्हा आहाराची विशेष काळजी घ्यावी. अशा लोकांनी आपल्या आहारात पोटॅशियम युक्त पदार्थांचा समावेश करावा, जेणेकरून त्यांचा बीपी नियंत्रणात राहील. तसेच, त्यांनी त्यांच्या जेवणातील मिठाचे प्रमाण पूर्णपणे कमी केले पाहिजे. अशा रुग्णांनी चहा प्यावा की, नाही हे देखील जाणून घेऊया...


रक्तदाबाच्या रुग्णांनी चहा पिणे योग्य की अयोग्य?


* तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, चहा प्यायल्याने रक्तदाब वाढत नाही. परंतु, असे अनेक लोक आहेत, ज्यांना रक्तदाबासोबतच इतर अनेक समस्या आहेत.  मग, अशा लोकांनी उच्च रक्तदाबात चहा पिऊ नये.


* उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना अॅसिडिटीचा त्रास असेल, तर त्यांनी चहा अजिबात पिऊ नये.


* उच्च रक्तदाब असलेल्यांला चिंता, तणाव असल्यासही चहा पिऊ नये. त्यांनी चहा प्यायल्यास बीपी वाढण्याची शक्यता असते.


* उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना लघवी करताना जळजळ होत असेल, तर त्यांनीही चहा टाळावा. जास्त चहा प्यायल्याने छाती आणि पोटात जळजळ होते.


* कोणत्याही व्यक्तीने रिकाम्या पोटी चहा पिऊ नये. रक्तदाब वाढलेला असेल, अशावेळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने त्याची पातळी आणखी वाढू शकते. या स्थितीत छातीत जळजळ होऊ शकते.


‘या’ उपायांनी रक्तदाब नियंत्रित करा!


* उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी कॅफीनचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. कॅफिन जास्त प्रमाणात घेतल्यास बीपीच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो.


* रक्तदाबाच्या रुग्णांनी आपल्या आहारात मीठ आणि सोडियमचे प्रमाण कमी ठेवावे. मीठ आणि सोडियमच्या अतिरेकामुळे रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो. कमी प्रमाणात मीठ खाल्ल्याने बीपी नियंत्रणात राहतो.


* चिप्स, लोणचे इत्यादी पॅक केलेल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते, ते टाळावे.


* धूम्रपान, मद्यपान टाळा. ते आरोग्यास हानी पोहोचवू शकते.


* बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी प्राणायाम, योगासने आणि व्यायाम यांचा जीवनशैलीत समावेश करणे आवश्यक आहे.


* सामान्यत: रक्तदाब 120/80MMHg असावा. रक्तदाब वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा येणे, अशक्तपणा येणे, डोकेदुखी व छातीत दुखणे अशा समस्या उद्भवतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha