Shattila Ekadashi : एकादशीचे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीच्या तिथील ‘षटतिला एकादशी’ (Shattila Ekadashi)म्हणून ओळखले जाते. या दिवशी व्रत ठेऊन भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. षटतिला एकादशीला तीळ दान केल्याने पुण्य मिळते. असेही मानले जाते. जाणून घेऊया या एकादशीबद्दल…


षटतिला एकादशीच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व!


षटतिला एकादशीला तिळाचे महत्त्वही सांगितले जाते. या दिवशी तिळाचा वापर करणे शुभ मानले जाते. तीळ हे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जातात. तीळ हे उष्ण प्रभावाचे असल्याने थंडीत याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी तीळ मिसळलेल्या पाण्याने आंघोळ करणे, तिळायुक्त पदार्थ खाणे चांगले मानले जाते. अर्थात ‘षटतिला एकादशी’ आयुर्वेदातील आणि आहारातील तिळाचे महत्त्व अधोरेखित करते.


कधी आहे षटतिला एकादशी?


28 जानेवारी 2022 ही शुक्रवारी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. या दिवशी एकादशीचे व्रत केले जाईल. माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि रोग, दुःख इत्यादीपासून मुक्ती मिळते. तसेच, या दिवशी व्रत केल्यास कन्यादान, हजारो वर्षांची तपश्चर्या आणि सुवर्णदान यांसारखे पुण्य प्राप्त होते, असेही मानले जाते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha