मुंबई: पापांपासून मुक्ती देणारं व्रत म्हणून ओळखलं जाणारं व्रत म्हणजे ऋषी पंचमी (Rishi Panchami) व्रत. आज 11 सप्टेंबर, शनिवारी ऋषी पंचमी आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी हे व्रत करतात. हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचं असं हे ऋषी पंचमी व्रत (Rishi Panchami Vrat) भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला करतात. 


ऋषीमुनींचा सन्मान करण्यासाठी ऋषी पंचमी साजरी केली जाते. हा शुभ सण प्रामुख्याने सप्तर्षींना समर्पित केला जातो. धार्मिक कथांनुसार, हे सात ऋषी म्हणजे वशिष्ठ, कश्यप, अत्री, जमदग्नी, गौतम, विश्वामित्र आणि भारद्वाजा हे आहेत.  ऋषी पंचमीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीचे भाग्य एका क्षणात बदलते आणि भूतकाळातील आणि वर्तमान जीवनातील सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते, अशी अख्यायिका आहे.


ऋषी पंचमी व्रत विधी (Rishi Panchami Vrat vidhi)
शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की, ऋषी पंचमीच्या दिवशी घर स्वच्छ करा. सात ऋषींसोबतच देवी अरुंधतीचीही विधीवत स्थापना करा. हळद, चंदन, फुले, अक्षता इत्यादींनी सात ऋषींची पूजा करा. पूर्ण विधीवत पूजा केल्यानंतर ऋषी पंचमी व्रत कथा ऐका. 


ऋषी पंचमीची व्रत कथा (Rishi Panchamichi Vrat Katha)
अख्यायिकनुसाक असं सांगितलं जात की, एक उत्तरा नावाचा ब्राह्मण होता. तो सुशीला नावाच्या पत्नीसोबत राहत होता. त्याची मुलगी विधवा झाली होती आणि त्यामुळे त्याच्यासोबतच राहत होती. एका रात्री मुलीच्या संपूर्ण शरीराला मुंग्या लागल्या. या गघटनेने तिचे आई-वडील चिंतेत बुडाले. त्यानी हा प्रकार एका ऋषीला सांगतला. त्यानंतर ऋषींनी सांगितले की त्यांच्या मुलीने तिच्या मागील जन्मात मासिक पाळीच्या काळात पाप केले होते. त्याची शिक्षा तिला आता शरीरावर मुंग्या लागून मिळत आहे. ऋषींनी पापांच्या मुक्तीसाठी त्या ब्राम्हण कन्येला ऋषी पंचमीचे व्रत करण्यास सांगितले. ब्राह्मण कन्येने ऋषी पंचमीचे व्रत केल्याने तिचे सर्व कष्ट दूर झाले. तिला सर्व पापांपासून मुक्ती मिळाली आणि पुढच्या जन्मात सौभाग्य प्राप्त झाले.