Weekly Upcoming Festival 2023 : सध्या भाद्रपद महिना सुरू आहे. हा भाद्रपद आणि सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आहे, जो 25 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हा दिवस भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी आहे. या दिवशी उत्तराषाद नक्षत्र असेल. तसेच सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उपवास आणि सणांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्यात अनेक महत्त्वाचे व्रत आणि सण असतील. 25 सप्टेंबर ते 01 ऑक्टोबर 2023 या काळात म्हणजेच सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अनेक महत्त्वाचे उपवास आणि सण साजरे केले जातील. या आठवड्यात गणेशोत्सवाची समाप्ती होणार असून पितृ पक्षही सुरू होणार आहे.



सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा असेल खास
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भाद्रपद पौर्णिमा, अनंत चतुर्दशी व्रत, परिवर्तिनी एकादशी, बुद्ध प्रदोष व्रत, वामन जयंती, गणेश विसर्जन, पितृपक्ष, पंचक इत्यादी उपवास आणि सण साजरे केले जातील. अशात हा आठवडा पूजेसाठी खास राहील. 25 सप्टेंबर ते 01 ऑक्‍टोबर 2023 या कालावधीत येणार्‍या व्रत आणि सणांबद्दल जाणून घेऊया.


 


सोमवार, 25 सप्टेंबर 2023, परिवर्तिनी एकादशी व्रत : सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी, 25 सप्टेंबर रोजी परिवर्तिनी एकादशी व्रत पाळले जाईल. या व्रताबद्दल अशी श्रद्धा आहे की या एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत कूस बदलतात. या दिवशी सकाळी 09:12 ते 10:42 पर्यंतचा काळ पूजेसाठी शुभ राहील. या आधी पूजा करू नका, कारण राहुकाळ असेल.


 



26 सप्टेंबर 2023 मंगळवार, वामन जयंती, पंचक प्रारंभ : 26 सप्टेंबर 2023 ही भाद्रपदाच्या शुक्लपक्षाच्या द्वादशी दिवशी वामन जयंती आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंनी वामन अवतार घेतला होता. या दिवशी पूजा केल्याने माणसातील अहंकाराची भावना नाहीशी होते.


 



बुधवार, 27 सप्टेंबर 2023, बुध प्रदोष व्रत : या दिवशी बुध प्रदोष व्रत साजरा केला जाईल. हे व्रत केल्याने कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते. या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्यासाठी संध्याकाळी 06:12 ते 08:36 पर्यंतचा काळ शुभ राहील. तसेच या दिवसापासून पंचक सुरू होत आहे. पंचकातील पाच दिवसांत शुभ कार्ये वर्ज्य आहेत.


 



28 सप्टेंबर 2023 गुरुवार, गणेश विसर्जन आणि अनंत चतुर्दशी 2023 : 28 सप्टेंबर हा खूप खास दिवस आहे. या दिवशी बाप्पाला पुढील वर्ष लवकर यावे, या शुभेच्छा देऊन निरोप दिला जाईल. तसेच या दिवशी अनंत चतुर्दशी व्रत पाळण्यात येणार आहे. हिंदू धर्मात दोन्ही सण महत्त्वाचे मानले जातात.


 



शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023, पितृ पक्ष सुरू होतो आणि भाद्रपद पौर्णिमा : पितृ पक्ष 29 सप्टेंबरपासून सुरू होईल, जो 14 ऑक्टोबर रोजी संपेल. पितृ पक्षादरम्यान पितरांचे श्राद्ध आणि पिंडदान केले जाते. याशिवाय हा दिवस भाद्रपद पौर्णिमाही आहे. पौर्णिमेच्या दिवशी स्नान, दान, व्रत आणि उपासनेला विशेष महत्त्व आहे.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Pitru Paksha 2023: पितृ पक्षात मुलगी पिंडदानही करू शकते का? पुराणानुसार काय म्हटलंय?