Pitru Paksha 2023 : पूर्वजांना समर्पित वर्षातील 15 दिवसांना पितृ पक्ष म्हणतात. पौराणिक मान्यतेनुसार असे म्हटले जाते की, पितृ पक्षादरम्यान, यमराज आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्त करतात जेणेकरून ते आपल्या कुटुंबाकडून तर्पण, पिंड दान स्वीकारू शकतील. यावर्षी पितृ पक्ष 29 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत राहील. असे मानले जाते की, पितृ पक्षाच्या काळात पिंड दान दिवंगत आत्म्याला आत्मज्ञान दाखवण्यास मदत करते आणि त्यांना मोक्षाच्या दिशेने घेऊन जाते. परंतु पिंड दान कोण करू शकते? हे तुम्हाला माहिती आहे का? पिंडदान मध्ये किती पिंड बनवले जातात, त्याची पद्धत आणि नियम.



पिंड दान म्हणजे काय?



‘पिंड ’ या शब्दाचा अर्थ एखाद्या वस्तूचे गोलाकार स्वरूप. प्रतिकात्मक स्वरूपात शरीराला पिंड देखील म्हणतात. पिंड हा तांदूळ, जवाचे पीठ, काळे तीळ आणि तूप दान करून बनवलेला गोल आकाराचा असतो. याला पिंड दान म्हणतात.


 


पितृ पक्षातील पिंड दानाचे महत्त्व


पितृपक्षात मृत नातेवाईकांचे पिंडदान करणे हे सुख-समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. धार्मिक ग्रंथांमध्ये, मृत्यूनंतर प्रेत-योनीत जाऊ नये यासाठी पितरांना तर्पण करण्याचे खूप महत्त्व आहे. पितरांना तर्पण केल्याने त्यांची मुक्ती होते, तसेच प्रेत-योनीतूनही त्यांची मुक्तता होते. असे मानले जाते की पिंड दान केले नाही तर पितरांचे आत्मा दुःखी आणि असंतुष्ट राहतात.


 


मुली पिंड दान करू शकतात का?


ब्रह्मवैवर्त पुराणानुसार, आत्म्याच्या समाधानासाठी ज्येष्ठ पुत्र आपल्या वडिलांसाठी आणि वंशजांसाठी श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण करतात. वडिलोपार्जित ऋणातून मुक्त होण्यासाठी पुत्रांचे पिंड दान करणे आवश्यक आहे, परंतु जर एखाद्या व्यक्तीला मुलगा नसेल तर अशा कुटुंबातील मुलगी, पत्नी व सून हे त्यांच्या वडिलांचे श्राद्ध व पिंड दान करू शकतात. 


 


पिंड दान पद्धत


पिंडदानासाठी सर्वोत्तम वेळ सकाळी 11.30 ते दुपारी 12.30 पर्यंत आहे. यासाठी पिठाचे गोळे बनवा . त्यात शिजवलेला भात, दूध, साखर, मध आणि तूप मिसळा. दक्षिण दिशेला तोंड करून फुले, चंदन, मिठाई, फळे, अगरबत्ती, तीळ, जव आणि दही यांनी पिंडाची पूजा करा. पिंडदान केल्यानंतर पितरांची पूजा करावी. यानंतर, पिंड उचला आणि पाण्यात विसर्जन करा. ब्राह्मणांना भोजन द्यावे. पंचबली भोग काढून त्यानंतरच कुटुंबातील सदस्यांनी भोजन करावे.



पिंडदान मध्ये किती पिंड केले जातात


धार्मिक मान्यतेनुसार पितृ पक्षात तीन पिढ्यांपर्यंत श्राद्ध केले जाते. पिंड दानमध्ये प्रामुख्याने पहिले तीन पिंड बनवले जातात. वडील, आजोबा आणि पणजोबा. वडील हयात असतील तर आजोबा आणि पणजोबा यांच्या नावाने पिंड तयार होतात.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Daughters Day 2023 : हिंदू धर्मात मुलगी पूजनीय! कोणत्या वयात कोणत्या देवीचे रूप? जाणून घ्या मुलींचे महत्त्व