Varad Lakshmi Vrat 2023 : श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी वरदलक्ष्मी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल अशा व्यक्तीचे  मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे. घराच्या ईशान्य दिशेला मंडप घालून तिथे चौरंगावर कलशस्थापना करावी. त्या कलशावर वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला एकवीस अपपूंचा नैवेद्य दाखवून पूजेला आलेल्या सर्व स्त्रिया, ब्राह्मणांना वाण द्यावे. देवीची कथा ऐकावी, असा ह्या व्रताचा विधी आहे. या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी दिलेली माहिती जाणून घ्या. 


वरलक्ष्मी व्रत 2023 तिथी (Varalakshmi Vrat 2023 Date) 


वरलक्ष्मी व्रत तिथी आरंभ: 24 ऑगस्ट गुरुवार, सकाळी 5 वाजून 55 मिनिटांपासून
वरलक्ष्मी व्रत तिथी समापन : 25 ऑगस्ट शुक्रवार, संध्याकाळी 6 वाजून 50 मिनिटापर्यंत
अशात सूर्योदयाप्रमाणे वरलक्ष्मी व्रत 25 ऑगस्ट रोजी ठेवले जाईल.


वरलक्ष्मी व्रत 2023 दोन शुभ योग


25 ऑगस्टला दोन शुभ योग तयार होत आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धि योग सकाळी 05 वाजून 55 मिनिटापासून ते सकाळी 09 वाजून 14 मिनिटापर्यंत राहील. तर रवि योग सकाळी 09 वाजून 14 मिनिटापासून ते 26 ऑगस्ट शनिवारी सकाळी 05 वाजून 56 मिनिटापर्यंत राहील.


वरदलक्ष्मी व्रत कथा :


एकदा कैलासावर शिव-पार्वती सारीपाट खेळत होती. त्यावेळी एक डाव कोणी जिंकला ह्याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला असता त्याने भगवान शिवशंकरांच्या बाजूने निर्णय दिला. त्यावेळी रागावलेल्या पार्वतीमातेने त्या गणाला ‘तू कुष्ठरोगी होशील’ असा शाप दिला. परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिले. तसेच त्याला उ:शाप देण्यास सांगितले. तेव्हा पार्वतीने ‘एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करीत असतील. त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल, असे सांगितले. त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले. परिणामी तो रोगमुक्त झाला.


सद्यःस्थिती :


वरलक्ष्मी व्रत हे एक पारंपरिक व्रत म्हणून अनेक स्त्रिया हे व्रत आजही त्यात खंड पडू नये म्हणून करतात. श्रद्धापूर्वक करतात. घराबाहेर मंडप वगैरे घालून पूजा करणेही आजच्या काळात शक्य नाही. त्यामुळे ही पूजा देवळात किंवा घरी केली जाते.


महत्त्वाच्या बातम्या :


Shravan 2023 : आजपासून निज श्रावण मासारंभ; श्रावणात नागपंचमी, रक्षाबंधनसह महत्त्वाचे सण कधी? वाचा सविस्तर माहिती