Travel: सध्या आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर (Tirupati Balaji Mandir) आणि येथे मिळणारा प्रसाद अवघ्या जगभरात चर्चेत आहे. येथील लाडूंमध्ये भेसळ होत असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. हे मंदिर नेहमीच प्रसादासाठी ओळखले जाते. अलीकडेच हे मंदिर त्याच्या प्रसादावरून वादात सापडले आहे. भारत देश हा धार्मिक स्थळांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हा एक असा देश आहे, जिथे विविध मंदिरं आणि देवांची भूमी म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. येथे सर्व धर्मांची अनेक प्रसिद्ध अध्यात्मिक ठिकाणे आहेत, त्यांना भेट देण्यासाठी दूरदूरहून लोक भारतात येतात. एवढेच नाही तर देशातील इतर अनेक मंदिरांमध्येही स्वादिष्ट प्रसादाचे वाटप केले जाते. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही प्रमुख मंदिरांबद्दल आणि त्यांच्या खास प्रसादाबद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या...



भारतातील काही प्रमुख मंदिरं आणि त्यांचा खास प्रसाद


तिरुपती बालाजी हे मंदिर जेवढे प्रसिद्ध आहे, तितकाच त्याचा प्रसाद देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळेच येथील प्रसादाबाबतच्या वृत्तानंतर वाद निर्माण झाला आहे. या मंदिराचा प्रसाद नेहमीच भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. भारतात अशी इतर अनेक मंदिरे आहेत, जिथे प्रसाद लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि प्रत्येकाला तो खाण्याची विशेष इच्छा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील अशाच काही प्रमुख मंदिरांबद्दल आणि त्यांच्या खास प्रसादाबद्दल सांगणार आहोत 



शिर्डी साईबाबा मंदिर, महाराष्ट्र


महाराष्ट्रातील शिर्डी येथे असलेले हे साईबाबांचे मंदिर देश-विदेशात खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी लांबून लोक येतात. येथे उदी प्रसाद म्हणून वाटली जाते, जी एक प्रकारची  राख आहे. तसेच डाळ, पोळी, भात, भाजी, मिठाई यासह मोफत जेवण म्हणजेच महाप्रसादही दिला जातो.



सिद्धिविनायक मंदिर, मुंबई, महाराष्ट्र


महाराष्ट्राची राजधानी मुंबईत असलेले हे गणेशाचे मंदिर हिंदूंच्या प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. येथे दररोज मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी येतात. येथे प्रसाद म्हणून मिळणारे मोदक भाविकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. यामुळेच लोक ते प्रसाद म्हणून देतात आणि स्वतः सेवन करतात.


 


जगन्नाथ मंदिर, पुरी, ओडिशा


पुरी, ओडिशातील जगन्नाथ मंदिर अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. यातील एक कारण म्हणजे येथे उपलब्ध असलेला महाप्रसाद, ज्यामध्ये खिचडी, डाळी, भाज्या, मिठाई अशा विविध पदार्थांचा समावेश आहे. मंदिराच्या स्वयंपाकघरात प्रसाद बनवला जातो आणि तो पवित्र असण्यासोबतच खूप चवदारही असतो.



श्रीवैष्णो देवी मंदिर, कटरा, जम्मू


जम्मूच्या सुंदर खोऱ्यांमध्ये असलेले देवी वैष्णोदेवीचे मंदिर जगभर प्रसिद्ध आहे. हे हिंदूंसाठी एक लोकप्रिय आणि महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, जिथे प्रत्येकाला भेट द्यायची आहे. या मंदिराचा प्रसादही भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. येथे उपलब्ध असलेल्या प्रसादामध्ये चुरमुरे, पांढरे साखरेचे बत्ताशे किंवा चिरोंजी, सुकं सफरचंद आणि खोबरं इत्यादींचा समावेश आहे.


 


सुवर्ण मंदिर, अमृतसर, पंजाब


पंजाबमधील अमृतसर येथे असलेले सुवर्ण मंदिर केवळ देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. येथे मिळणाऱ्या लंगर प्रसादाचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. अत्यंत साधेपणाने तयार केलेला हा पौष्टिक प्रसाद खायलाही खूप चविष्ट आहे.



गुरुवायूर मंदिर, केरळ


केरळमध्ये स्थित गुरुवायूर मंदिर त्याच्या खास प्रसाद पलापायसमसाठी देखील ओळखले जाते. तांदूळ, दूध आणि साखरेपासून बनवलेली ही गोड तांदळाची खीर आहे, जी देवाला अर्पण केल्यानंतर भक्तांमध्ये वाटली जाते.


 


हेही वाचा>>>


Navratri 2024 Travel: काय महिमा वर्णू तिचा हो! इथे देवीच्या मूर्तीला चक्क घाम फुटतो, भारतातील अनोखे शक्तीपीठ, नवरात्रीनिमित्त घ्या दर्शन


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )