एक्स्प्लोर

Surya Grahan 2023 : 2023 च्या शेवटच्या सूर्यग्रहणाची नेमकी वेळ, शुभ संयोग, त्याचा परिणाम जाणून घ्या

Surya Grahan 2023 : वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आज 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आज शनि अमावस्या देखील एक शुभ योगायोग ठरत आहे. या दिवशी केलेल्या दानाचे विशेष महत्त्व आहे.

Surya Grahan 2023 : 2023 वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आज होणार आहे. आज शनिश्चरी अमावस्याही आहे. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहणाचा हा योगायोग 100 वर्षांनंतर घडत आहे. सूर्यग्रहणाची नेमकी वेळ, शुभ संयोग, त्याचा परिणाम जाणून घ्या


सूर्यग्रहणाची वेळ
भारतीय वेळेनुसार 14 ऑक्टोबर रोजी रात्री 8:34 वाजता होणार आहे. दुपारी 2.25 वाजता संपेल. या सूर्यग्रहणाची मध्यवर्ती वेळ रात्री 11:29 वाजता असेल, या दरम्यान ग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 51 मिनिटे असेल. 14-15 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी सूर्यग्रहण होईल.


असे पाहा सूर्यग्रहण 
आज होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, पण ते थेट ऑनलाइन पाहता येईल. हे तुम्ही वर्च्युअल टेलीस्कोपद्वारे देखील पाहू शकता. याशिवाय नासाच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाऊन सूर्यग्रहणाचे थेट कव्हरेज पाहता येईल.


ग्रहण काळात या गोष्टी करा
ज्योतिषशास्त्रानुसार, आज काही उपाय करून सूर्यग्रहणाचे अशुभ परिणाम टाळता येतील. 
सूर्यग्रहण काळात देवाची मनोभावे पूजा करावी. 
गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करणे देखील फायदेशीर आहे. 
असे केल्याने ग्रहणाचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडणार नाही. 
ग्रहणकाळात नारळ जवळ ठेवा आणि ग्रहण संपल्यानंतर ते वाहत्या पाण्यात सोडा. 
यामुळे ग्रहणाचा प्रभाव नाहीसा होतो.


सूर्यग्रहणाचा या राशींवर पडेल नकारात्मक प्रभाव 
ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक राशींना आज होणाऱ्या ग्रहणाचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. आजचे ग्रहण मेष, सिंह, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी अशुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना शारीरिक, आर्थिक आणि मानसिक नुकसान, अपघाताचा फटका देखील सहन करावा लागू शकतो. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी.

 

ग्रहण काळात ही काळजी घ्या
असे मानले जाते की, ग्रहण काळात नकारात्मक शक्ती सक्रिय होतात. त्यामुळे ग्रहण काळात घराबाहेर पडणे टाळावे. ग्रहण काळात काहीही खाऊ नये आणि शिजवू नये. गर्भवती महिलांनी विशेष खबरदारी घ्यावी. धारधार वस्तू जवळ बाळगू नये. आज अमावस्या देखील आहे, त्यामुळे या दिवशी निर्जन ठिकाणी जाणे टाळावे.


सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी
सुतक कालावधी सूर्यग्रहणाच्या 12 तास आधी सुरू होतो. या काळात पूजा आणि कोणत्याही शुभ कार्यावर बंदी घालण्यात आली आहे. आज होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे येथे सुतक कालावधीही वैध राहणार नाही.


या ठिकाणी सूर्यग्रहण दिसणार
आजचे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, कॅनडा, ब्रिटिश व्हर्जिन आयलंड, ग्वाटेमाला, मेक्सिको, अर्जेंटिना, कोलंबिया, क्युबा, बार्बाडोस, पेरू, उरुग्वे, अँटिग्वा, व्हेनेझुएला, जमैका, हैती, पॅराग्वे, ब्राझील आणि डोमिनिका या देशांमध्ये दिसणार आहे. ते भारतात दिसणार नाही.


सूर्यग्रहण आणि शनि अमावस्या यांचा विशेष संयोग
आज शनि अमावस्याही आहे. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहणाचा हा योगायोग 100 वर्षांनंतर घडत आहे. शनिदोष, शनीची साडेसाती आणि धैय्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस उत्तम मानला जातो. या दिवशी शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात.


सूर्यग्रहणाची वेळ
आज होणारे सूर्यग्रहण अनेक अर्थाने विशेष असणार आहे. आज शनिवारी होणारे हे ग्रहण रात्री 8:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2:25 वाजता संपेल.


वर्षातील दुसरे सूर्यग्रहण आज होणार
आज वर्षातील दुसरे सूर्यग्रहण होणार आहे. या सूर्यग्रहणात 'रिंग ऑफ फायर' दिसणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही. हे ग्रहण आज कन्या आणि चित्रा नक्षत्रातील अमावस्या तिथीला होईल. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, जे भारतात दिसणार नाही.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Surya Grahan 2023 : आज वर्षातील दुसरे सूर्यग्रहण होणार, कोणत्या राशीवर होणार परिणाम? भारतात दिसणार का? जाणून घ्या

 

महत्त्वाच्या बातम्या

Bhaubij 2026: भाऊबीजेला भावाला नारळ आणि करगोटा का देतात? नेमकी काय आहे ही परंपरा? धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
भाऊबीजेला भावाला नारळ आणि करगोटा का देतात? नेमकी काय आहे ही परंपरा? धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Tulsi Vivah 2026 : नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी असणार तुळशी विवाह; आत्ताच नोट करा तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
नोव्हेंबर महिन्यात 'या' दिवशी असणार तुळशी विवाह; आत्ताच नोट करा तारीख आणि पूजेचा शुभ मुहूर्त
Bhaubij 2026: आज भाऊबीज! भावाच्या औक्षणासाठी 'हा' शुभ मुहूर्त; का करतात भाऊबीज? पूजा विधी, धार्मिक महत्त्व, परंपरा...
आज भाऊबीज! भावाच्या औक्षणासाठी 'हा' शुभ मुहूर्त; का करतात भाऊबीज? पूजा विधी, धार्मिक महत्त्व, परंपरा...
Bhaubij Wishes 2026 in Marathi: आज भाऊबीज...प्रियजनांना 'हे' 10 खास शुभेच्छा संदेश पाठवा, भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा गोडवा वाढवा! 
आज भाऊबीज...प्रियजनांना 'हे' 10 खास शुभेच्छा संदेश पाठवा, भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा गोडवा वाढवा! 

व्हिडीओ

Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nvidia :  एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं, जेनसेन हुआंगच्या अडचणीत वाढ
एनवीडियाचे सीईओ जेनसेन हुआंग यांचा राजीनामा, चिनी महिलेसोबतचं प्रेमप्रकरण भोवलं
Nagpur Hotel Fire : नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
नागपूरमधील अनंततारा हॉटेलला आग, शॉर्ट सर्किटनं आग लागली, एका व्यक्तीचा मृत्यू, तीन जण जखमी
NCP Merger : माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला,सुप्रिया सुळे यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर भाष्य
माझा भाऊ गेला तेव्हाच माझ्यासाठी तो विषय संपला, सुप्रिया सुळेंचं विलिनीकरणावर स्पष्ट मत
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यायचं ठरलं होतं, 18 जानेवारीला बैठक झालेली; विलिनीकरणाबाबत हर्षवर्धन पाटलांनी सगळं सांगितलं
Gold Rate : सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, IBJA कडून दर जाहीर, डिसेंबरमध्ये सोनं दीड लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा अंदाज
सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी 3901 रुपयांनी स्वस्त, IBJA कडून दर जाहीर
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
तहसील कार्यालयात अस्वच्छता, मंत्री गिरीश महाजनांच्या हाती झाडू; दारुच्या रिकाम्या बाटल्या पाहून संताप
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
मेकअप आर्टिस्टच्या घरातील पोटमाळ्यावर कोकेनचा साठा; साथीदारालाही अटक, 21 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
Embed widget