Surya Grahan 2023 : विज्ञानामध्ये ग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते. परंतु धार्मिक दृष्टिकोनातून ती अशुभ घटना मानली जाते. धार्मिक आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार ग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळी सूर्याचा प्रभाव पडतो, ज्यामुळे प्रत्येक मनुष्य आणि प्राणी प्रभावित होतात. वर्षातील पहिले सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी झाले. आता लवकरच वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण होणार आहे.
वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण यावेळी होणार
2023 वर्षातील शेवटचे ग्रहण 14 ऑक्टोबर 2023 रोजी अश्विन अमावस्येला होणार आहे. हे ग्रहण शनिवार, 14 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 2:25 वाजता समाप्त होईल. हे ग्रहण पश्चिम आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अटलांटिक आणि आर्क्टिक सारख्या देशांमध्ये दिसणार आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कंकणाकृती असेल. हे ग्रहण भारतात दिसणार नाही.
सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी
ग्रहणाशी अनेक प्रकारच्या धार्मिक श्रद्धा निगडीत आहेत. सूर्यग्रहणात सुतक कालावधी हा ग्रहण सुरू होण्याच्या 12 तास आधी सुरू होतो. ग्रहणापूर्वीचा सुतक काळ अशुभ मानला जातो. धार्मिक मान्यतांनुसार, सुतकादरम्यान पृथ्वीचे वातावरण प्रदूषित होते आणि त्याचे हानिकारक दुष्परिणाम टाळण्यासाठी अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागते. सुतक काळात पूजा करणे निषिद्ध मानले जाते. तर, ग्रहण दिसत असताना सुतक कालावधी सुरू होतो.
भारतात दिसणार का ग्रहण?
वर्षातील शेवटचे ग्रहण भारतात दिसणार नाही. या कारणास्तव त्याचा सुतक कालावधी भारतात वैध राहणार नाही. हा सुतक काळ मानला जात नसल्यामुळे येथे उपासनेसारखे उपक्रम करता येतात.
ग्रहण काळात या गोष्टी करू नयेत
असे मानले जाते की, ग्रहणाच्या वेळी आपल्याभोवती नकारात्मक ऊर्जा वाढू लागते. यामुळेच या काळात काही गोष्टी करण्यास मनाई आहे. ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करू नये. सूर्यग्रहण काळात काहीही खाऊ किंवा पिऊ नये. या काळात काहीही शिजवण्यासही मनाई आहे. असे मानले जाते की, यावेळी बाहेर पडणारी नकारात्मक ऊर्जा खाण्याच्या सवयींवर देखील परिणाम करते.
सूर्यग्रहण म्हणजे काय?
विज्ञानामध्ये ग्रहण ही खगोलीय घटना मानली जाते. जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा चंद्राच्या मागे सूर्याची प्रतिमा काही काळ पूर्णपणे झाकलेली असते. या प्रक्रियेलाच सूर्यग्रहण म्हणतात. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आल्याने प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे पृथ्वीचा काही भाग दिवसाच्या प्रकाशात काही काळ गडद दिसतो. शास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Shani Dev : हनुमानजींची पूजा करणाऱ्यांना शनिदेव का त्रास देत नाहीत? पौराणिक कथा जाणून घ्या