Shani Dev : हिंदू धर्मात (Hindu Religion) आठवड्यातील प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवतेच्या पूजेला समर्पित असतो. त्याचप्रमाणे मंगळवार हा देखील हनुमानजींच्या (Lord Hanuman) पूजेसाठी शुभ मानला जातो, तसेच हा दिवस हनुमानजींच्या उपासनेसाठी आणि व्रतासाठी समर्पित आहे.
मंगळवारी हनुमानजीसोबत शनिदेवाचीही पूजा करू शकता
धार्मिक मान्यतेनुसार, मंगळवारी हनुमानजीसोबत शनिदेवाचीही पूजा करू शकता. त्याचप्रमाणे शनिवारीही शनिदेवासह हनुमानजींची पूजा करू शकता. हनुमानजींची पूजा करणार्या भक्तांवर शनिदेवाची कृपा सदैव राहते असे म्हणतात.
हनुमानजीच्या पूजेने शनिदेव का प्रसन्न होतात?
हनुमान जी आणि शनिदेवाचा काय संबंध आहे? हनुमानजीच्या पूजेने शनि महाराज का प्रसन्न होतात? हा प्रश्न नेहमीच लोकांच्या मनात असतो. याच्याशी संबंधित एक पौराणिक कथा आहे, ज्यामध्ये त्याचे कारण सांगितले आहे, त्याबद्दल जाणून घ्या
हनुमानजी आणि शनिदेव यांची पौराणिक कथा
ही कथा त्रेतायुगातील रामायण काळातील आहे. जेव्हा रावणाने देवी सीता यांचे अपहरण करून तिला लंकेत नेले होते, तेव्हा रामाच्या आज्ञेवरून हनुमानजी देवी सीतेच्या शोधात लंकेत पोहोचले. हनुमानजी जेव्हा लंकेत पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिले की, रावणाने शनिदेवाला आधीच कैद करून ठेवले होते. त्यावेळी हनुमानजी देवी सीतेला सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत. कारण देवी सीता म्हणाली की, जेव्हा भगवान श्रीराम तिला न्यायला येतील तेव्हाच ती त्यांच्यासोबत जाईल. पण हनुमानजींनी शनिदेवाची मदत करून त्यांना रावणाच्या तुरुंगातून बाहेर काढले. जेव्हा हनुमानजींनी शनिदेवाची मदत केली, तेव्हा ते खूप आनंदी झाले आणि त्यांनी हनुमानजींना त्या बदल्यात काही वरदान मागायला सांगितले.
शनिदेवाने हनुमानजींना वरदान मागण्यास सांगितले
तेव्हा हनुमानजी म्हणाले - जो भक्त माझी भक्तिभावाने पूजा करतो, त्याला तू कधीही शिक्षा करणार नाहीस. त्यांच्या वचनानुसार शनिदेवाने हनुमानजींना होकार दिला. यानंतर शनिदेवाच्या पूजेसोबतच शनिवारी हनुमानजींची पूजा होऊ लागली.
शनिदेवाची कृपा मिळवायची असेल तर...
त्यामुळे जर तुम्हालाही शनिदेवाची कृपा मिळवायची असेल, तसेच त्यांच्या प्रकोपापासून वाचायचे असेल तर तुम्ही मंगळवारी तसेच शनिवारी हनुमानजी आणि शनिदेवाची पूजा करू शकता. यासोबतच मंगळवारी शनिदेवाशी संबंधित उपायही करू शकता. याने तुम्हाला शनिदेव आणि हनुमानजी अशा दोघांचाही आशीर्वाद मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या