Navratri 2023 Live Updates : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात, साडेतीन शक्तीपीठ मंदिरांसह घरोघरी घटस्थापना
Navratri 2023 Live Updates : शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते. या नऊ दिवसांत भाविकांची मंदिरात गर्दी दिसून येते.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 15 Oct 2023 11:45 AM

पार्श्वभूमी
Shardiya Navratri 2023 Live Updates : आजपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरूवात झाली आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी...More
Shardiya Navratri 2023 Live Updates : आजपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरूवात झाली आहे. दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील शक्तीपीठ असलेल्या देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली जाते आणि या नऊ दिवसांमध्ये भाविकांची या मंदिरात गर्दी दिसून येते. आपल्या देशात देवींना सर्वोच्च स्थान आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठ असलेल्या देवींच्या मंदिरांसोबतच इतर महत्त्वाच्या मंदिरात उत्सव कशाप्रकारे साजरा होत आहे, जाणून घ्या,
Navratri 2023 : तुळजाभवानी मंदीर संस्थानकडून व्हीआयपी दर्शनाचा गोंधळ, व्हीआयपी दर्शन बंद
धाराशिव - तुळजाभवानी मंदीर संस्थानकडून व्हीआयपी दर्शनाचा गोंधळ. व्हीआयपी दर्शन बंद
मंदीर कार्यालयात घोषणाबाजी करीत सुरु केले आंदोलन
गेल्या 3 तासापासून 500 रुपये सशुल्क दर्शन रांगेत भाविकांची गर्दी
स्थानिक पुजारी व काही खासगी लोकांनी पास रांग सोडून घेऊन जात असल्यामुळे गोंधळ उडाला
तुळजाभवानी मंदीर संस्थानने बंद केले व्हीआयपी दर्शन पास