Sarva Pitri Amavasya 2023: सर्वपित्री अमावस्या कधी आहे? याच दिवशी वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण, जाणून घ्या
Sarva Pitri Amavasya 2023: पितृ पक्षामध्ये सर्वपित्री अमावस्येला सर्व पितरांना निरोप दिला जातो. श्राद्धासाठी हा दिवस उत्तम आहे. अमावस्येची तिथी जाणून घ्या, या दिवशी सूर्यग्रहण देखील आहे
Sarva Pitri Amavasya 2023 : हिंदू धर्मात (Hindu) प्रत्येक महिन्याची अमावस्या असली तरी अश्विन महिन्यात येणारी अमावस्या सर्वात विशेष मानली जाते. ती सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी पितृ पक्षाची समाप्ती होते. पितृ पक्षामध्ये सर्वपित्री अमावस्येला सर्व पितरांना निरोप दिला जातो. श्राद्धासाठी हा दिवस उत्तम आहे. असे म्हटले जाते की, जे लोक संपूर्ण पितृ पक्षात आपल्या पूर्वजांना तर्पण आणि पिंड दान देऊ शकले नाहीत. ते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध करू शकतात. या दिवशी पिंड दान करण्याचे सर्वात जास्त महत्त्व आहे. या वर्षीच्या सर्वपित्री अमावस्येची तिथी आणि महत्त्व जाणून घेऊया.
सर्वपित्री अमावस्या 2023 कधी आहे?
पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 पासून सुरू होत आहे, तर सर्वपित्री अमावस्येला समाप्त होईल. या वर्षी सर्वपित्री अमावस्या 14 ऑक्टोबर 2023, शनिवारी आहे. शनिवार असल्याने याला शनिश्चरी अमावस्या असेही म्हटले जाईल. 2023 सालचे दुसरे सूर्यग्रहणही याच दिवशी होत आहे.
सर्वपित्री अमावस्या 2023 श्राद्ध वेळ
श्राद्धविधीसाठी दुपारची वेळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते. त्यासाठी कुतुप आणि रौहीन मुहूर्त पाळल्या जातात. सूर्यास्तापूर्वी श्राद्ध करावे.
कुतुप मुहूर्त - सकाळी 11:44 - दुपारी 12:30
रोहीन मुहूर्त - दुपारी 12:30 - 01:16 दुपारी
दुपारची वेळ - 01:16 ते 03:35
सर्वपित्री अमावस्या 2023 सूर्यग्रहण वेळ (सूर्यग्रहण 2023)
पंचांगानुसार वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण देखील अश्विन महिन्यातील सर्वपित्री अमावस्येला होत आहे. सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण रात्री 08.34 ते दुसऱ्या दिवशी पहाटे 02.25 पर्यंत राहील. हे कंकणाकृती सूर्यग्रहण असेल, जे भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधीही वैध राहणार नाही.
सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व
पौराणिक मान्यतेनुसार, सर्वपित्री अमावस्येला महालय अमावस्या आणि पितृ विसर्जनी अमावस्या असेही म्हणतात. पितृपक्षाच्या काळात, पूर्वज आपल्या कुटुंबात पृथ्वीवर येतात आणि त्यांना आशीर्वाद देतात. सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध, पिंड दान आणि पूजा करून पूर्वजांना आदरपूर्वक निरोप दिला जातो. सर्वपित्री अमावस्या तिथीला केले जाणारे श्राद्ध कुटुंबातील सर्व पितरांच्या आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी पुरेसे असते, असे म्हटले जाते.
सर्वपित्री अमावस्येला या लोकांचे श्राद्ध करा
सर्वपित्री अमावस्येला, अमावस्या तिथी, पौर्णिमा तिथी आणि चतुर्दशी तिथीला मरण पावलेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी श्राद्ध केले जाते.
जर काही कारणास्तव त्याला मृत्यू तिथीला श्राद्ध करता येत नसेल तर केवळ अमावस्या तिथीलाच श्राद्ध करता येते
ज्या पितरांची मृत्यु तारीख माहित नाही. त्यांचे श्राद्धही अमावस्या तिथीला करता येते, म्हणूनच अमावस्या श्राद्धाला सर्वपित्री मोक्ष अमावस्या असेही म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Tuesday Astrology : आजचा मंगळवार महत्त्वाचा! कर्जमुक्तीसाठी 'हे' काम अवश्य करा, ज्योतिषशास्त्रात म्हटंलय...