Ashadhi wari 2023 :  संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सणसरचा मुक्काम आटपून गुरुवारी सकाळी साडेसात वाजता बेलवाडीमध्ये रिंगण सोहळ्यासाठी दाखल झाला. इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण पार पडले. पालखीला अगोदर प्रथम झेंडेकरी नंतर तुळशी वृंदावन घेत महिला वारकरी,त्यानंतर विणेकरी यानंतर मानाच्या पालखी बरोबर असणाऱ्या अश्वाने रिंगणाच्या तीन फेऱ्या केल्या. मात्र यावर्षी रिंगण सोहळा सुरू झाल्याने रिंगणात उत्साह दिसून आला. संत तुकाराम महाराजांचा आजचा मुक्काम अंथुर्णे येथे असणार आहे. 


पूर्ण देहभान हरपून विठुनामाचा जप करीत, तुकाराम महाराजांचा जयघोष करीत वारकऱ्यांनी पहिले गोल रिंगण केले. हा नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी गर्दी केली होती. वारीच्या वाटेवर रिंगण सोहळा हा वारकऱ्यांना आनंद देणारा उत्साहीत करणारा सोहळा असतो. यामुळे वारकऱ्यांना बेलवाडीतील रिंगण सोहळ्याची उत्सुकता असते. संत तुकाराम महाराजांच्या पालखीतील अश्व रिंगणाला पार महत्व आहे. त्यामुळे दरवर्षी पालखीला अश्व रिंगण घातलं जातं. या सोहळ्यासाठी अनेक वारकरी आतुर असतात. 


संत ज्ञानोबांची पालखीचं पहिलं उभं रिंगण, पालखी तरडगावला मुक्कामी


संत ज्ञानोबांची पालखी आज लोणंदहून मार्गस्थ होऊन रात्री तरडगावला मुक्कामी असणार आहे. चांदोबाचा लिंग येते आज ज्ञानोबांच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण होणार आहे. हरिनामाच्या जयघोषात आणि टाळ-मृदुंगांच्या गजरात काल माउलीं काल माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान करण्यात आले. आज उभं रिंगण असल्यानेहजारो वारकऱ्यांची गर्दी जमली आहे. टाळ मृदुंगाचा गजरात वारकरी, भाविकांची शिस्तबध्द उभी रांग, माउलींच्या अश्वांची दौड आणि दिंडीतील वारकर्‍यांनी धरलेला ठेका, सोबतच टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या गजरानं आसमंत दुमदुमून जात आहे. ज्ञानोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम तरडगावमध्ये असणार आहे.