Pitru Paksha 2023 : पितृपक्ष हा पितरांना समर्पित आहे. या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. पंचांगानुसार पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अमावास्येला समाप्त होतो.


 


श्राद्धाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व
पितृपक्ष म्हणजेच श्राद्धाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पितृ पक्षादरम्यान, पितरांचे स्मरण करण्यासाठी श्राद्ध विधी केले जातात. पितृपक्षात पितरांना नैवेद्य दाखवून आणि श्राद्धविधी केल्याने मोक्षप्राप्ती होते. या काळात, श्राद्ध केवळ पितरांच्या मोक्षासाठीच नाही तर त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी देखील केले जाते. पितृपक्षात पितरांना श्रद्धेने जल अर्पण करण्याची परंपरा आहे. ज्योतिषांच्या मते, यावर्षी 29 सप्टेंबर 2023 पासून पितृपक्ष सुरू होत असून तो 14 ऑक्टोबरला संपेल. पितृपक्षादरम्यान, पितरांचे स्मरण करण्यासाठी श्राद्ध विधी केले जातात. पितृपक्षात पितरांना नैवेद्य दाखवून श्राद्धविधी केल्याने मोक्षप्राप्ती होते. या काळात, श्राद्ध केवळ पितरांच्या मोक्षासाठीच नाही तर त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी देखील केले जाते. श्राद्ध म्हणजे पितृ पक्षात (अश्विन कृष्ण पक्ष प्रतिपदेपासून अमावस्या पर्यंत) पितरांसाठी केलेले तर्पण आणि पिंडदान.


 


पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध 


ज्योतिषी म्हणाले की, श्राद्ध म्हणजे भक्तीने पितरांना प्रसन्न करणे. धार्मिक मान्यतेनुसार देहत्याग केलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी खऱ्या भक्तीभावाने केलेल्या पूजेला श्राद्ध म्हणतात. असे मानले जाते की मृत्यूची देवता यमराज श्राद्ध पक्षाच्या वेळी पितरांना मुक्त करतात, जेणेकरून ते त्यांच्या नातेवाईकांकडे जाऊन नैवेद्य घेऊ शकतात. ज्यांचे कुटुंबातील सदस्य, विवाहित किंवा अविवाहित, मूल किंवा वृद्ध, पुरुष किंवा महिला, मृत पावतात त्यांना पूर्वज म्हणतात. पितृ पक्षादरम्यान, पूर्वज मृत्यूनंतर पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आशीर्वाद देतात. पितृपक्षाच्या काळात पितरांना त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी अर्पण केले जाते. जेव्हा पितर प्रसन्न असतात तेव्हा घरात सुख-शांती असते.



श्राद्ध केल्याने पितरांना मिळते समाधान आणि शांती 
ज्योतिषी सांगतात की, दरवर्षी पितृपक्षात पिंडदान, तर्पण, हवन इत्यादी पितरांसाठी केले जातात. प्रत्येकजण आपापल्या पितरांचे त्यांच्या मृत्युतिथीनुसार श्राद्ध करतो. असे मानले जाते की, जे पितृपक्षात पितरांना नैवेद्य दाखवत नाहीत त्यांना पितृदोषाचा त्रास होतो. श्राद्ध केल्याने त्यांच्या आत्म्याला समाधान आणि शांती मिळते. तेव्हा ते तुमच्यावर आनंदी होतात आणि संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद देतात. दरवर्षी लोक गया येथे जाऊन त्यांच्या पूर्वजांच्या शांतीसाठी पिंड दान देतात. ज्योतिषाने सांगितले की, पितृ पक्षात ज्या दिवशी मृत व्यक्तीच्या मृत्यूची तिथी असते त्याच दिवशी श्राद्ध केले जाते. श्राद्ध केवळ पित्यासाठीच नाही तर पितरांचेही केले जाते. जेव्हा कोणी त्याचे शरीर सोडते तेव्हा सर्व अंत्यसंस्कार करणे आवश्यक आहे, कारण यामुळे आत्म्याला आध्यात्मिक बळ मिळते आणि तो आत्मा तृप्त होतो. प्रत्येक आत्म्याला अन्न, पाणी आणि मन:शांतीची गरज असते, ती फक्त त्याच्या कुटुंबातील सदस्यच पूर्ण करू शकतात. धार्मिक मान्यतेनुसार, श्राद्धाच्या वेळी कुटुंबियांच्या वतीने पिंडदान, तर्पण करून त्यांना संतुष्ट करतील अशी पूर्वजांना आशा असते. या आशेने ते पृथ्वीवर येतात. हेच कारण आहे की हिंदू धर्मग्रंथांमध्ये प्रत्येक हिंदू व्यक्तीला पितृ पक्षात श्राद्ध करण्यास सांगितले आहे. 


पितृ पक्ष कधी सुरू होतो?


ज्योतिषाने सांगितले की, हिंदू दिनदर्शिकेनुसार यावर्षी 29 सप्टेंबरपासून पितृ पक्ष सुरू होत आहे. त्याच वेळी, आश्विन कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला ती समाप्त होते. यावेळी अमावस्या 14 ऑक्टोबरला येत आहे.


श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण यांचा अर्थ


ज्योतिषाने सांगितले की, पितृ पक्षाच्या काळात कुटुंबातील मृत पूर्वजांचे स्मरण श्रद्धापूर्वक केले जाते, याला श्राद्ध म्हणतात. पिंडदान करणे म्हणजे आपण आपल्या पूर्वजांना अन्नदान करत आहोत. तर्पण करण्याचा अर्थ असा आहे की, आपण पाणी दान करत आहोत. अशाप्रकारे पितृ पक्षात या तीन कार्यांचे महत्त्व आहे. पितृ पक्षाच्या काळात गायींसाठी हिरवे गवत आणि गोठ्यात पैसे दान करावेत. पिठाचे गोळे बनवून तलावातील माशांना खायला द्यावे. कुत्र्यांनाही भाकरी खायला द्यावी. यासोबतच घराच्या छतावर कावळ्यांसाठी अन्नही ठेवावे. गरजू लोकांना अन्नदान करा. मंदिरात पूजा साहित्य अर्पण करा. या दिवसांत भगवद्गीतेचे पठण करावे.


अन्नाचे पाच भाग


ज्योतिषाने सांगितले की, पितृ पक्षाच्या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि आशीर्वाद देतात. पितृपक्षात पितरांचे श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. आपले पूर्वज पशु-पक्ष्यांमधून आपल्या जवळ येतात. पूर्वज गाय, कुत्रा, कावळा आणि मुंगी यांच्याद्वारे अन्न घेतात. श्राद्धाच्या वेळी पितरांसाठी अन्नाचा काही भागही काढला जातो, तरच श्राद्ध विधी पूर्ण होतो. श्राद्ध करताना पितरांना अर्पण केलेल्या अन्नातील पाच भाग गाय, कुत्रा, मुंगी, कावळा आणि देवांसाठी काढले जातात. कुत्रा हे जल तत्वाचे, मुंगी हे अग्नि तत्वाचे, कावळा हे वायु तत्वाचे, गाय हे पृथ्वी तत्वाचे आणि देव हे आकाश तत्वाचे प्रतिक आहे. अशाप्रकारे या पाच जणांना अन्नदान करून आपण पंचतत्त्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. फक्त गायीमध्ये पाच घटक एकत्र आढळतात. त्यामुळे पितृ पक्षातील गायीची सेवा विशेष फळ देते.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या :


Weekly Horoscope 11 September to 17 September 2023 : येणारा आठवडा 'या' राशींसाठी लाभदायक, तर इतर राशींसाठी आव्हानात्मक; साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या