Pitru Paksha 2023 : धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांचे ऋण उतरते आणि पितरांच्या आत्म्यांना मोक्ष प्राप्त होतो. पितृ पक्षादरम्यान, दिवंगत पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. असे मानले जाते की, जर पूर्वज दु:खी असतील तर, त्या व्यक्तीच्या कुटुंबातील जीवन सुखी राहत नाही आणि त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जाणून घ्या नियम आणि महत्त्व
 


पितृपक्षात श्राद्ध करणे आवश्यक का असते?
एवढेच नाही तर घरात अशांतता पसरते. व्यवसायात आणि घरातील नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृ पक्षात श्राद्ध करणे आवश्यक मानले जाते. ज्योतिषांच्या मते, श्राद्धाद्वारे पितरांना तृप्त करण्यासाठी अन्नदान केले जाते. पिंड व तर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती लाभते. श्राद्धाच्या वेळी आपण जे काही देण्याचा संकल्प करतो, ते पितरांना नक्कीच मिळते. ज्या तिथीला पूर्वजांचे निधन झाले, त्याच तिथीला श्राद्ध केले जाते. ज्यांच्या पूर्वजांच्या कुटुंबाला मृत्यूची तिथी माहीत नाही त्यांचे श्राद्ध अमावस्येला केले जाते.


 
पितरांचे श्राद्ध करण्याच्या किती संधी आहेत आणि कोणती सर्वोत्तम आहे?
ज्योतिषाने सांगितले की, शास्त्रानुसार पितरांचे श्राद्धविधी करण्यासाठी वर्षभरात 96 संधी आहेत. वर्षातील 12 महिन्यांतील 12 अमावस्या तिथीलाही श्राद्ध करता येते. श्राद्ध विधी करून तीन पिढ्यांतील पितरांना नैवेद्य दाखवता येतो. श्राद्ध तीन पिढ्यांपर्यंत चालते. श्राद्ध हे मुलगा, नातू, किंवा पुतणे करू शकतात. ज्यांच्या घरात पुरुष सदस्य नाहीत अशा ठिकाणी महिलाही श्राद्ध करू शकतात. पितृ पक्षात सर्व तिथींचे वेगळे महत्त्व आहे. पितृ पक्षात ज्या तिथीला व्यक्तीचा मृत्यू होतो त्या तिथीला श्राद्ध विधी केले जातात.


 
श्राद्ध कधी आणि कोणाचे करावे?
पितृ पक्ष पौर्णिमा तिथीपासून सुरू होतो. 


आजी-आजोबांच्या कुटुंबातील एखाद्याचा प्रतिपदेला मृत्यू झाला असेल आणि मृत्यूची तारीख माहित नसेल, तर त्याचे श्राद्ध प्रतिपदेला केले जाते.


पंचमी तिथीला अविवाहित व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याचे श्राद्ध या तिथीला करावे. 


जर एखाद्या स्त्रीचा मृत्यू झाला असेल आणि मृत्यूची तारीख माहित नसेल तर तिचे श्राद्ध नवमी तिथीला केले जाते. 


एकादशीला मृत भिक्षूंचे श्राद्ध केले जाते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे श्राद्ध चतुर्दशी तिथीला करावे. 


सर्वपित्री मोक्ष: अमावस्येला ज्ञात-अज्ञात सर्व पितरांचे श्राद्ध करावे. अकाली मृत्यू झालेल्यांचे श्राद्ध चतुर्दशीला केले जाते.
 


श्राद्ध म्हणजे काय?
ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, पूर्वजांप्रती श्रद्धा आणि भक्तीने केलेल्या कार्याला श्राद्ध म्हणतात. पितरांसाठी श्रद्धेने केलेल्या मोक्षाच्या विधीला श्राद्ध म्हणतात. त्यांना तृप्त करण्याच्या प्रक्रियेला तर्पण म्हणतात. तर्पण करणे म्हणजे पिंडदान करणे होय. भाद्रपदाच्या पौर्णिमेच्या दिवसापासून अश्विन कृष्णाच्या अमावास्येपर्यंत एकूण 16 दिवस श्राद्ध चालते. या 16 दिवसांमध्ये आपले पूर्वज आपल्या घरात सूक्ष्म रूपात वास करतात. श्राद्धात श्रीमद्भागवत गीतेच्या सातव्या अध्यायाचे महात्म्य वाचावे. यानंतर संपूर्ण अध्यायाचे पठण करावे. या पाठाचे फळ आत्म्याला अर्पण करावे. श्राद्ध केल्याने पितरांसह देवताही संतुष्ट होतात. श्राद्ध-तर्पण म्हणजे आपल्या पितरांप्रती आपला आदर आहे. याद्वारे पितरांचे ऋणही फेडले जाते. श्राद्धाच्या 16 दिवसात अष्टमुखी रुद्राक्ष धारण करा. या दिवसांमध्ये 16 किंवा 21 मोराची पिसे घरात ठेवा. शिवलिंगावर दूध मिसळून जल अर्पण करा. रोज घरीच खीर बनवा.



गाय, कुत्रा आणि कावळ्यांना अन्न का देतात?
सर्व प्रथम, गाय, कुत्रा आणि कावळ्यासाठी स्वतंत्रपणे अन्न घ्या. असे मानले जाते की हे सर्व जीव यमाच्या अगदी जवळ आहेत. श्राद्ध पक्षाच्या काळात व्यसनांपासून दूर राहा. शुद्ध राहूनच श्राद्ध केले जाते. श्राद्ध पक्षादरम्यान शुभ कार्ये निषिद्ध मानली जातात. श्राद्धासाठी योग्य वेळ दुपारची मानली जाते. श्राद्ध रात्री केले जात नाही. श्राद्धात बेसनाचा वापर करण्यास मनाई आहे. श्राद्धात लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यांचा वापर करू नये. पितृदोष शांत झाल्यावर आरोग्य, कुटुंब आणि पैसा यासंबंधीचे अडथळेही दूर होतात.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Pitru Paksha 2023 : पितृपक्षात दाढी, मिशा, नखं आणि केस कापावेत की नाही? शास्त्रानुसार काय आहेत नियम? जाणून घ्या