Pitru Paksha 2023 : 29 सप्टेंबर शुक्रवारपासून पितृ पक्ष सुरू होत आहे. पितृ पक्षातील काळ हा 14 ऑक्‍टोबरपर्यंत चालेल, म्हणजे 17 दिवस या वेळी तुम्ही पितरांचे श्राद्ध आणि इतर गोष्टी करू शकाल. दरवर्षी पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंत चालू असतो. पितृ पक्षाला श्राद्ध किंवा महालय असेही म्हणतात. या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तर्पण, पिंड दान आणि श्राद्ध विधी केले जातात. पितृपक्षात अशी अनेक कामे आहेत, जी लोक टाळतात, त्यापैकी एक म्हणजे केस आणि नखे कापणे. शास्त्रानुसार तसेच पौराणिक मान्यतेनुसार, पितृ पक्षाच्या काळात दाढी, मिशा आणि केस कापावेत की नाही? हे जाणून घ्या



या लोकांसाठी काही नियम आहेत?
पितृ पक्षाच्या म्हणजेच श्राद्धाच्या वेळी बरेच लोक केस, दाढी, मिशा किंवा नखे ​​कापणे टाळतात. शास्त्रात असे म्हटले आहे की, पितृकर्म करणार्‍या व्यक्तीने श्राद्ध पक्षात दररोज पितरांना तर्पण आणि श्राद्धतिथीच्या दिवशी श्राद्ध कर्म केले, तरच त्याने केस, दाढी, मिशा किंवा नखे ​​कापू नयेत. इतर लोक केस, दाढी, मिशा किंवा नखे ​​कापू शकतात.



प्रत्येक व्यक्तीवर तीन प्रकारचे ऋण
विविध मान्यतेनुसार, केस किंवा नखे ​​कापणे हा एक छंद किंवा श्रृंगाराशी संबंधित गोष्ट आहे, म्हणून पितृ पक्षादरम्यान अनेक लोक केस कापत नाही. तुमचा या गोष्टींवर विश्वास असो वा नसो, शास्त्रानुसार पण पितृ पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमचे केस किंवा नखे ​​कापू शकता. कारण पितृ पक्ष हा पितरांचे स्मरण करून सात्त्विक जीवन जगण्याचा काळ आहे. त्यामुळे नखे किंवा केस कापू नयेत अशी केवळ एक धारणा आहे. कारण शास्त्रानुसार प्रत्येक मनुष्यावर तीन प्रकारचे ऋण असतात, पहिले देव ऋण, दुसरे ऋषी ऋण आणि तिसरे पितृ ऋण.


 


या गोष्टींपासूनही दूर राहा
 पितृपक्षात केस, दाढी, मिशा किंवा नखे ​​कापणे याशिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत, ज्या निषिद्ध मानल्या जातात. शास्त्रानुसार, या दिवसांत ब्रह्मचर्य व्रत पाळावे. तसेच लसूण, कांदा, मांस, मद्य इत्यादी तामसिक गोष्टींचे सेवन करू नये. तसेच या काळात शिळे अन्न खाऊ नये. या काळात शुभ कार्ये करण्यास देखील मनाई आहे.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Pitru Paksha 2023 : पितृऋण आणि पितृदोष यात मोठा फरक, तो दूर करण्यासाठी पितृ पक्षात करा 'हे' उपाय