Pitru Paksha 2023 : पितृ पक्षाच्या दुसऱ्या तिथीचे श्राद्ध 30 सप्टेंबर 2023 रोजी केले जाईल. शास्त्रानुसार, द्वितीया श्राद्धाच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी या झाडांची पूजा करायला विसरू नका. पितृदोष शांत होईल


 


 


पितृ पक्षात या झाडांची पूजा करावी
आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाची दुसरी तिथी 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12.21 वाजता सुरू होईल. 1 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 09.41 वाजता संपेल. संपूर्ण पितृ पक्षात पितरांना तर्पण, पिंडदान करण्यासोबतच बेलपत्र, पिंपळ आणि वडाच्या झाडांची पूजा करावी. असे मानले जाते की, यामुळे पितरांना शक्ती मिळते. तसेच ते समाधानी राहतात.


 



बेलाचे झाड
श्राद्ध पक्षात सकाळी बेलाच्या झाडात गंगाजल अर्पण करणे शुभ असते. यामुळे पितरांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा होतो. पितृ पक्षात बेलाचे रोप लावल्याने आर्थिक संकट दूर होते.


 



पिंपळ
पिंपळाच्या झाडात पितरांचे वास्तव्य असते. विशेषत: शनिवारी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा, तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पितृदोष दूर होतो. संतती वाढण्याचे आशीर्वाद मिळतात.



वडाचे झाड
काळे तीळ पाण्यात मिसळून ते श्राद्ध पक्षाच्या वेळी वटवृक्षाला अर्पण केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. पितरांच्या आशीर्वादाने वैवाहिक जीवन सुखी होते.


 


पितरांना संतुष्ट करा
पितृ पक्षादरम्यान, दिवंगत पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते. असे मानले जाते की जर पूर्वज खूश नसतील तर, त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे जीवन सुखी राहत नाही आणि त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. एवढेच नाही तर घरात अशांतता पसरते, व्यवसायात व घरातील नुकसानीला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पितरांना संतुष्ट करण्यासाठी आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृ पक्षात श्राद्ध करणे आवश्यक मानले जाते. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, श्राद्धाद्वारे पितरांना तृप्त करण्यासाठी अन्नदान केले जाते आणि पिंड व तर्पण दान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती लाभते. श्राद्धाच्या वेळी आपण जे काही देण्याचा संकल्प करतो, ते पितरांना नक्कीच मिळतात. ज्या तिथीला पूर्वजांचे निधन झाले त्याच तिथीला श्राद्ध केले जाते. ज्यांच्या पुढच्या जगात जाण्याची तारीख माहीत नाही त्यांचे श्राद्ध अमावस्येला केले जाते.


 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Pitru Paksha 2023 : कुटुंबातील मृत व्यक्तीच्या मृत्यूची तिथी आठवत नाही? तर पितृ पक्षात श्राद्ध केव्हा करावे? जाणून घ्या