Pitru Paksha 2023 : पितृपक्षात श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. शास्त्रात असं म्हटलंय की, श्राद्धविधी पुत्रांच्या माध्यमातून केले तरच पितरांना मोक्ष प्राप्त होतो.
वाल्मिकी रामायणात देवी सीतेद्वारे सासरा राजा दशरथाचे श्राद्ध करण्याचे वर्णन आहे. देवी सीतेने राजा दशरथाचे पिंडदान का केले? ते जाणून घ्या


 



देवी सीतेने राजा दशरथाचे श्राद्ध केले
वाल्मिकी रामायणातील एका घटनेनुसार, वनवासात भगवान राम, देवी सीता आणि लक्ष्मणजी पितृ पक्षात श्राद्ध करण्यासाठी गेले होते. तेथे ब्राह्मणाने त्यांना श्राद्धासाठी लागणारे साहित्य गोळा करण्यास सांगितले, त्यानंतर श्री राम आणि लक्ष्मणजी ते साहित्य गोळा करण्यासाठी गेले. बराच वेळ होऊनही राम आणि लक्ष्मण आले नाहीत तेव्हा ब्राह्मण देवाने सीतेला पिंडदान करण्याची विनंती केली.


 



वाळूचे पिंड करून पिंडदान करण्यात आले.
देवी सीतेलाही बराच वेळ उलटून गेल्यावर काळजी वाटू लागली, तेव्हा स्वर्गीय राजा दशरथांच्या आत्म्याने सीतेला दर्शन दिले, आणि पिंडदान करण्याची विनंती केली. वेळेचे महत्त्व समजून देवी सीतेने आपले सासरे राजा दशरथ यांना पिंडदान देण्याचा निर्णय घेतला. देवी सीतेने फाल्गु नदीच्या काठावर वाळूचे एक पिंड बनवले. यावेळी वडाचे झाड, केतकीचे फूल, नदी आणि गाय यांना साक्षी घेऊन स्वर्गीय राजा दशरथ यांना पिंडदान दिले.


 



देवी सीतेला दिला आशीर्वाद
यावर राजा दशरथाचा आत्मा खूप प्रसन्न झाला आणि देवी सीतेला आशीर्वाद दिला. जेव्हा श्रीरामांना हे कळले, तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही. कारण रामाला माहित होते की, आवश्यक सामान आणि पुत्राशिवाय श्राद्ध कसे केले जाऊ शकते? तेव्हा वटवक्षाने याची सत्यता सांगितली.


 



महिला श्राद्ध कधी करू शकतात?
धर्म सिंधु ग्रंथ, मनुस्मृती, मार्कंडेय पुराण आणि गरुड पुराणानुसार महिलांना तर्पण आणि पिंडदान करण्याचा अधिकार आहे. मार्कंडेय पुराणात असे म्हटले आहे की, जर एखाद्याला मुलगा नसेल तर केवळ पत्नीच मंत्रांशिवाय श्राद्ध करू शकते. गरुड पुराणात सांगितले आहे की जर घरात वृद्ध स्त्री असेल तर तिला तरुणीच्या आधी श्राद्ध करण्याचा अधिकार आहे.


 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या 


Pitru Paksha 2023: घरात पितृदोष आहे की नाही हे कसे ओळखावे? पितृदोषाची लक्षणे काय? मुक्तीसाठी उपाय जाणून घ्या