Navratri 2023 : देवी दुर्गेचे (Goddess Durga) भक्त वर्षभर शारदीय नवरात्रीची वाट पाहत असतात. या वर्षी शारदीय नवरात्रीचा सण कधी साजरा केला जाईल? घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे? चैत्र नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते. जाणून घ्या
शारदीय नवरात्री 2023 तारीख आणि वेळ
दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. शारदीय नवरात्रीची सुरुवात घटस्थापनेने होणार आहे. यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात 15 ऑक्टोबर 2023 पासून होणार आहे आणि 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालणार आहे.
घटस्थापनेचा शुभ मुहूर्त
यंदा नवरात्रीत घटस्थापनेचा मुहूर्त 15 ऑक्टोबर 2023 सकाळी 11:44 ते 12:30 असा आहे. यावेळी, भाविक आपल्या घरात तसेच मंडपामध्ये घटस्थापना करू शकतात.
शैलपुत्री हा पहिला अवतार
चैत्र नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या नऊ अवतारांची पूजा केली जाते. देवी शैलपुत्री हा माता दुर्गेच्या नऊ अवतारांपैकी पहिला अवतार आहे. देवी पार्वतीला शैलपुत्री म्हणतात. कारण तिचे वडील पर्वतराज हिमालय होते. यानंतर नवदुर्गेमध्ये देवी ब्रह्मचारिणी, देवी चंद्रघंटा, देवी कुष्मांडा, देवी स्कंदमाता, देवी कात्यायनी, देवी कालरात्री, देवी महागौरी आणि देवी सिद्धिदात्री आहे.
कोणत्या दिवशी कोणत्या नवदुर्गेची पूजा केली जाईल?
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री मातेची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते.
नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री मातेची पूजा केली जाते.
या चार मंत्रांचा जप करा
देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी पूजेदरम्यान या चार मंत्रांचा जप केल्यास देवी प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल
शारदीय नवरात्रि इस तारीख से हो रही है शुरू, कलश स्थापना का शुभ मुहूर्त होगा इतने बजे
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोऽस्तुते।।
ओम जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी।
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते।।
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
सर्वस्वरुपे सर्वेशे सर्वशक्तिमन्विते ।
भये भ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमो स्तुते ॥
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या