Vastu Tips : वास्तुशास्त्रात (Vastu Shashtra) दिशांसोबतच घरात ठेवलेल्या प्रत्येक गोष्टीचे विशेष महत्त्व मानले जाते. वास्तूनुसार, एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती तो त्याच्या पर्समध्ये काय ठेवतो? यावर बरेच काही अवलंबून असते. वास्तूमध्ये पर्सशी संबंधित काही खास नियमही करण्यात आले आहेत. यानुसार ठेवलेल्या काही गोष्टी तुमच्या आर्थिक संकटाला कारणीभूत ठरू शकतात. जाणून घ्या पर्समध्ये कोणत्या वस्तू ठेवू नयेत.


 


वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण बनतात
अनेकवेळा असे घडते की, काही घरांमध्ये पैशाची सतत कमतरता असते. पती-पत्नी दोघांनी मिळून कमावल्यानंतरही घरातील आर्थिक संकट संपताना दिसत नाही. अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च होतात आणि तुम्हाला हवं असलं तरी पैसेही वाचवता येत नाहीत. वास्तुशास्त्राच्या नियमांनुसार, तुमच्या घरात असलेले वास्तू दोष आर्थिक संकटाचे कारण असू शकतात. आम्ही तुम्हाला असे काही वास्तू दोष सांगणार आहोत जेणेकरुन तुम्ही ते तपासून दूर करू शकता.



चुकूनही या गोष्टी पर्समध्ये ठेवू नका


वास्तुशास्त्रानुसार चुकूनही पर्समध्ये जुने बिल ठेवू नये. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. पर्समध्ये अनावश्यक वस्तू ठेवल्याने धनाची देवी लक्ष्मी नाराज होते. पर्समध्ये ठेवलेला जुना कागद हळूहळू कचरा होऊ लागतो. वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये टाकाऊ कागद ठेवल्याने पैसे पर्समध्ये राहत नाही. पर्समध्ये ठेवलेल्या अनावश्यक बिलांमुळे आर्थिक संकट निर्माण होते.


 


जिवंत किंवा मृत व्यक्तीचा फोटो
पर्समध्ये कधीही जिवंत किंवा मृत व्यक्तीचा फोटो ठेवू नये. वास्तूनुसार पर्समध्ये कोणत्याही देवतेचे चित्र कधीही ठेवू नये. अशी चित्रे पर्समध्ये ठेवणे अशुभ मानले जाते, असे केल्याने व्यक्तीचे कर्ज वाढते आणि वास्तुदोष होतात. पर्समध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते.


 


पैशांची घडी
पर्समध्ये पैसे कसेही ठेवू नये. पर्समध्ये पैसे व्यवस्थित ठेवणे केव्हाही चांगले. पैशांची घडी करून पर्समध्ये ठेवल्याने वास्तुदोष होतात आणि आर्थिक संकट ओढवते. नोटा आणि नाणी कधीही पर्समध्ये एकत्र ठेवू नयेत. पर्समध्ये नेहमी नाणी आणि नोटा वेगवेगळ्या ठेवा.


 


चाव्या
वास्तुशास्त्रानुसार चाव्या कधीही पर्समध्ये ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये चाव्या ठेवल्याने व्यक्तीच्या जीवनात गरिबी येते. त्यामुळे चुकूनही चाव्या पर्समध्ये ठेवू नका. चावी ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते असे मानले जाते.


 


फाटलेली नोट


वास्तुशास्त्रानुसार फाटलेल्या नोटा कधीही पर्समध्ये ठेवू नयेत. तुमच्या पर्समध्ये आधीच फाटलेली नोट असेल तर ती बदलून घ्या. फाटलेली पर्स देखील वापरू नये. फाटलेली पर्स ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो असे मानले जाते.


 


उधार घेतलेले पैसे


वास्तूनुसार, उधार घेतलेले पैसे कधीही पर्समध्ये ठेवू नयेत. असे मानले जाते की, उधार घेतलेले पैसे पर्समध्ये ठेवल्याने कर्जाचा बोजा वाढतो आणि आर्थिक नुकसानही होते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या


Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवादरम्यान 'या' शुभ गोष्टी घरी आणा, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही