Ganesh Visarjan 2023 : श्रीगणेशाला (Shri Ganesh) बुद्धीची देवता मानले जाते. हिंदू धर्मानुसार, प्रत्येक धार्मिक कार्याच्या प्रारंभी गणेशाची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीपासून ते 10 दिवस गणपतीचा भाविकांच्या घरी वास असतो. अशात 19 सप्टेंबरला गणेशोत्सव सुरू झाला असून पुढचे 10 दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केली जाते. देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का? बाप्पाचे विसर्जन का करण्यात येते? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा


 


विघ्नहर्ता भाविकांचे सर्व दु:ख दूर करतो.


गणेशोत्सवाचे आगमन होताच सर्वत्र जल्लोष पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता आहे. 10 दिवस बाप्पाची भरपूर सेवा केली जाते आणि त्याच्या आवडत्या वस्तूंचा प्रसाद दिला जातो. यानंतर बाप्पाच्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन केले जाते. गणेशोत्सवात श्रीगणेशाची सेवा केल्याने तो प्रसन्न होतो आणि आशीर्वाद देतो. तसेच विघ्नहर्ता भाविकांचे सर्व दु:ख दूर करतो.


 


तेव्हापासून सुरू झाली गणपती विसर्जनाची प्रथा 


पौराणिक कथेनुसार, वेद व्यासजींनी गणेशजींना महाभारताचा मजकूर लिहिण्यासाठी श्रीगणेशाला निवडले, कारण त्यांना बोलण्याच्या गतीनुसार लिहू शकणाऱ्या व्यक्तीची गरज होती. वेदव्यासजींनी गणेशजींना आवाहन केले. गणेशजींनीही त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. 10 दिवस, वेद व्यासजींनी न थांबता महाभारताचे वर्णन केले आणि गणेशजी ते लिहीत राहिले. 10 दिवसांनंतर, वेदव्यासजींनी पाहिले की गणेशजींचे तापमान खूप वाढले आहे. त्यानंतर त्यांनी गणेशजींना तलावात आंघोळ घातली. तेव्हापासून गणपती विसर्जनाची प्रथा सुरू झाल्याचे मानले जाते.


 


अनंत चतुर्दशीला विशेष महत्त्व
हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या वर्षी अनंत चतुर्दशी 28 सप्टेंबर 2023 रोजी आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. या दिवशी गणेशोत्सवाची सांगता होते. बाप्पाला मोठ्या थाटामाटात निरोप दिला जातो आणि मूर्तीचे नदी आणि तलावांमध्ये विसर्जन केले जाते.


 


अनंत चतुर्दशी 2023 मुहूर्त
भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 27 सप्टेंबर 2023 रोजी रात्री 10:18 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 28 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 06:49 वाजता समाप्त होईल.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या


Ganesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवादरम्यान 'या' शुभ गोष्टी घरी आणा, कधीही पैशाची कमतरता भासणार नाही