Navratri 2023 Durga Ashtami : शारदीय नवरात्रीची महाष्टमी आज 22 ऑक्टोबर 2023, शनिवारी आहे. नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी जगदंबेचे आठवे रूप देवी महागौरीची पूजा करण्याची परंपरा आहे. 



नवरात्रीची दुर्गाष्टमी विशेष 


नवरात्रीची दुर्गाष्टमी विशेष मानली जाते. या दिवशी लोक कन्या पूजा, कुळदेवी पूजा आणि संधिपूजा देखील करतात. असे मानले जाते की, या दिवशी महागौरीची पूजा केल्याने कधीही संपत्ती आणि समृद्धीची कमतरता येत नाही. शारदीय नवरात्रीच्या दुर्गाष्टमीचा शुभ मुहूर्त, महागौरीची पूजा पद्धत, नैवेद्य, मंत्र आणि महत्त्व जाणून घ्या 



शारदीय नवरात्री 2023 अष्टमी मुहूर्त


अश्विन शुक्ल अष्टमी तिथी सुरू होते - 21 ऑक्टोबर 2023, रात्री 09.53 वाजता


अश्विन शुक्ल अष्टमी तिथी समाप्त - 22 ऑक्टोबर 2023, संध्याकाळी 07.58



संधि पूजा मुहूर्त - सायंकाळी 07.35  - 08.22
ब्रह्म मुहूर्त - सकाळी 04.45 ते 05.35 पर्यंत
अभिजित मुहूर्त - सकाळी 11.43 - दुपारी 12.28
संधिप्रकाश मुहूर्त - सायंकाळी 05.45 - 06.1


महाष्टमी 2023 शुभ योग



धृती - 21 ऑक्टोबर, 12.37 रात्री - 22 ऑक्टोबर, 9.53 रात्री
रवि योग - 22 ऑक्टोबर, 06.44 सकाळी - 23 ऑक्टोबर, 6.27 सकाळी
सर्वार्थ सिद्धी - 6.26 सकाळी - 6.44 सायंकाळी



देवी महागौरी पूजन पद्धत


शारदीय नवरात्रीच्या महाअष्टमीच्या दिवशी देवी दुर्गेची आठवी शक्ती महागौरीची पूजा करण्यासाठी जांभळे किंवा पांढरे कपडे घाला. मंदिरात लाल वस्त्र दान करा. शुभ मुहूर्तावर कुंकु, चंदन, सिंदूर, मोगरा ही फुले अर्पण करा. 108 वेळा श्री क्लीं ह्रीं वरदायै नम: चा जप करा. महागौरीला नारळ अर्पण केलेले खूप आवडते. कुळदेवीची पूजा केल्यास तिचा नैवेद्य कुटुंबातच वाटावा. त्यानंतर 9 मुलींची पूजा करून त्यांना भोजन द्या. संधिकाळातही मातेची पूजा करावी. संधिकाळ हा देवीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात शुभ काळ मानला जातो.


 


देवी महागौरी मंत्र


ललाटं कर्णो हुं बीजं पातु महागौरी मां नेत्रं घ्राणो। कपोत चिबुको फट् पातु स्वाहा मा सर्ववदनो॥
श्री क्लीं ह्रीं वरदायै नम:
श्वेते वृषे समरूढा श्वेताम्बराधरा शुचिः। महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा।। 
या देवी सर्वभू‍तेषु मां गौरी रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।


 


महागौरीची कन्यापूजा


या दिवशी 9 मुलींना घरी बोलावून त्यांची पूजा केली जाते. यासाठी 2-10 वर्षे वयाच्या मुलींना आमंत्रित करा. कन्यापूजेनंतर त्यांना अन्नदान करा आणि भेटवस्तू देऊन निरोप द्या. ज्या घरात कन्या पूजा केली जाते त्या घरात दुर्गा माता वास करते असे मानले जाते.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या


Navratri 8th Day 2023 : नवरात्रीचा आठवा दिवस, देवीचे नाव महागौरी कसे पडले? शास्त्रात पूजेचे महत्त्व, देवीचे रुप जाणून घ्या