Masik Shivratri 2024 : धार्मिक मान्यतेनुसार, वैवाहिक जीवनात सुख, शांती आणि योग्य वर मिळण्यासाठी दर महिन्याला येणारी शिवरात्री अत्यंत महत्त्वाची मानली जाते. शिवरात्रीचे व्रत रात्रीचे केले जाते, या रात्री भगवान शिव (Lord Shiv) आणि देवी पार्वती (Goddess Parvati) एकत्र प्रवासाला निघतात. अशी पौराणिक मान्यता आहे. जो भाविक रात्रीच्या चारही प्रहरात जागा राहून भगवान शिवाची पूजा करतो, त्याची इच्छा भगवान शिव आणि देवी पार्वतीने पूर्ण करते. अशी धारणा आहे. फेब्रुवारीमध्ये पौष मासिक शिवरात्री 2024 ची तारीख, पूजा वेळ आणि महत्त्व जाणून घ्या.
फेब्रुवारी 2024 मध्ये पौष मासिक शिवरात्री कधी आहे?
पौष महिन्यात येणारी मासिक शिवरात्री गुरुवार, 8 फेब्रुवारी 2024 रोजी आहे. या दिवशी शिव-पार्वतीची उपासना केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात. दिनदर्शिकेनुसार, ही शिवरात्री 8 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11:17 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 9 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 08:02 वाजता संपेल.
शिवपूजा मुहूर्त - 12.09 रात्री - 01.01 रात्री, 9 फेब्रुवारी
मासिक शिवरात्री विशेष का आहे?
धार्मिक मान्यतेनुसार, पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिव, भगवान ब्रह्म आणि विष्णूजींच्या समोर अग्रि स्तंभाच्या रूपात प्रकट झाले. त्या वेळी आकाशवाणी झाली की, जो भक्त या तिथीच्या रात्री जागृत राहून माझ्या लिंगरूपाची पूजा करतो, त्याला अक्षय पुण्य प्राप्त होते. यामुळे या दिवशी शिवाची पूजा करणाऱ्यांचे दु:ख आणि दोष दूर होतात. सर्व भौतिक सुखाची प्राप्ती होते. या तिथीला देवी पार्वती आणि भगवान शिव यांचा विवाह झाला, या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्याने वैवाहिक जीवनात आनंद आणि चांगला जोडीदार प्राप्त होतो. शिवपुराणात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी तसेच मानवी जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांना भोळं म्हटलं गेलंय, त्यामुळे जे भक्त खऱ्या मनाने भक्ती करतात त्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात.
कर्जमुक्तीसाठी शिवलिंगाचा अभिषेक 'अशा' प्रकारे करा
कर्जमुक्तीसाठी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला उसाच्या रसाने अभिषेक करावा. या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने भगवान शिवशंकर आर्थिक अडचणीतून मुक्त करतात. तसेच जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो. ऋणातून मुक्ती मिळवण्यासाठी शिवलिंगाची विधिवत पूजा करावी. नंतर 'ओम ऋं मुक्तेश्वर महादेवाय नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते, तसेच शिवाच्या कृपेने कर्जापासून मुक्ती मिळते
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
शिवपुराणात सांगितलेले धनप्राप्तीचे उपाय जाणून घ्या, महाशिवरात्रीला शिव होतील प्रसन्न! जाणून घ्या