Mahashivratri 2023 : शिवपुराणात भगवान शंकराला (Lord Shiv) प्रसन्न करण्यासाठी तसेच मानवी जीवनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय इतके सोपे आहेत की, कोणीही ते सहज करू शकतो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवांना भोळं म्हटलं गेलंय, त्यामुळे जे भक्त खऱ्या मनाने भक्ती करतात त्यांच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतात. जाणून घ्या शिवपुराणात (Shiv Puran) सांगितलेल्या उपायांबद्दल...
शिवलिंगावर अभिषेक कसा करावा?
महाशिवरात्रीला गंगाजल आणि काळे तीळ मिसळून शिवलिंगाला अभिषेक करा. ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहा. असे केल्याने आर्थिक संकट दूर होते. नोकरी-व्यवसायातील समस्याही दूर होतात. जीवनातील सर्व नकारात्मकता काढून टाकते.
सोमवारपासून हे उपाय सुरू करा
पैशाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोमवारपासून हा उपाय करा. संध्याकाळी भगवान शिवाच्या मंदिरात जा, तिथल्या शिवलिंगाजवळ तुपाचा दिवा लावा. मनातील इच्छा सांगा. एका सोमवारपासून हा उपाय अखंड 41 सोमवार करावा लागतो. तुमची आर्थिक संकटे दूर करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो. जर महिलांनी हा उपाय करायचा झाल्यास, तसेच त्यांना मासिक पाळी येत असेल तर 5 दिवसांनी हा उपाय करा.
अखंड अक्षता उपाय
शिवपुराणात अखंड अक्षतांचा उपयोग शिवाच्या उपासनेत करावा असे सांगितले आहे. म्हणजेच तांदूळ तुटलेला नसून तो अख्खा असावा. देवाच्या पूजेत अखंड तांदूळ अर्पण केल्याने महालक्ष्मीची प्राप्ती होते. चांगले परिणाम मिळविण्यासाठी शिवलिंगावर कापड टाकून त्यावर तांदूळ अर्पण करावा. असे केल्याने तुम्हाला लवकर चांगले परिणाम मिळतात. शनिदोषात हा उपाय फायदेशीर आहे.
गहू आणि जव उपाय
शिवपुराणात गहू आणि जव हे भगवान शंकराच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे मानले गेले आहेत. शिवलिंगावर जवमिश्रित पाणी अर्पण केल्याने धनप्राप्ती होते. पितरही प्रसन्न होतात. महाशिवरात्रीच्या दिवशी गहू दान केल्याने कुळात वाढ होते. असे मानले जाते की, गव्हापासून बनविलेले पदार्थ भगवान शंकराला प्रिय आहेत. भगवान शंकराला पिठाचे लाडू अर्पण केल्याने तुमच्या घरात सुख नांदते.
देवी लक्ष्मी आणि कुबेर देवताही होतील प्रसन्न
असे मानले जाते की, रात्री शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधार दूर होतो. दररोज रात्रीच्या पूर्वार्धात शिवलिंगाजवळ दिवा लावल्याने तुमच्या घरातील अंधार दूर होतो. देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करते. असे केल्याने कुबेर देवताही तुमच्यावर प्रसन्न होतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Mahashivratri 2023 : कर्जातून मुक्त व्हायचंय? महाशिवरात्रीला करा 'हे' सोपे उपाय, शिवपुराणात सांगितलेले फायदे जाणून घ्या